जनजागृती ग्राहक मंचाची पनवेल महावितरण कार्यालयावर धडक
*जनजागृती ग्राहक मंचाची पनवेल महावितरण कार्यालयावर धडक*
पनवेल-मयूर भोसले
गेल्या पंधरा दिवसांपासून पनवेल महावितरण कार्यालयातील अधिकारी वीज बिल न भरलेल्या ग्राहकांवर धडक कारवाया करताना दिसत आहेत़.ज्या ज्या वीज धारकांनी वीज बिल भरले नाहीत त्यांची वीज खंडित करून त्यांना वीज बिल भरण्यासाठी भाग पाडले जात आहे. विजेची बिलं भरून महावितरण कार्यालयाला मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहें. पण जर वीज बिल आकारणी जास्त असेल वा बंद मीटरचे बिल वाढून आले असेल तर त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणी तरी पुढे यायला हवे. पनवेल मधील जन जाग्रुती ग्राहक मंच हे पनवेल मध्ये अतिशय सक्रिय असुन पनवेल मधील जनतेच्या हाकेला सद्देव उभे राहते.बंद मीटर च्या वाढीव बिलाचा असाच एक प्रकार पुढे आला असुन पनवेल मधील एका नामांकित डॉक्टरला गेल्या वर्ष भरा पासून बंद मीटरचे बिल भरावे लागतं आहें. वारंवार तक्रार करून सुध्दा महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आली नव्हती. सदर डॉक्टरांनी जनहित न्यूज महाराष्ट्रचे उप संपादक श्री मयूर भोसले यांच्या कडे संपर्क करताच जनजागृती ग्राहक मंच पनवेल यांकडे या बाबत तक्रार केली. ग्राहक मंचानी पनवेल महावितरण कार्यालयावर धडक देताच सदर डॉक्टरांना दिलासा मिळाला आहें.पनवेल मध्ये असे बरेच प्रकार घडत असुन महावितरण कार्यालयाचे डोकं ठिकाणावर आल नाही तर मोठ आंदोलन छेडन्यात येईल असे पनवेल जन जाग्रुती ग्राहक मंचाचे सचिव मा. श्री. बी. पी.म्हात्रे सर यांच्या कडून सांगण्यात आले आहें.या वेळी अध्यक्ष मा. श्री. के. एल. जाधव, एलेक्ट्रिकल इंजिनियर श्री.अत्तार, सदस्य श्री.रमेश चव्हाण व श्री संतोष विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद