नियोजन व व्यवस्था आमची निर्मिती श्री गणेश मूर्ती विसर्जन कुंडाची
नियोजन व व्यवस्था आमची निर्मिती श्री गणेश मूर्ती विसर्जन कुंडाची अंबरनाथ प्रतिनिधी अंबरनाथ चे शिवसेना नगरसेवक सुभाष नारायण साळुंके व संवाद फाउंडेशन च्या सौ सुवर्णा सुभाष साळुंके यांच्या वतीने ३ फुटा पर्यंत असलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करता यावे यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ बाल उद्यान, गावदेवी मैदान अंबरनाथ पूर्व या ठिकाणी भाविकांसाठी गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे कोरोना महामारी नंतर येणारा श्री गणेशोत्सव आनंदात मंगलमय वातावरणात साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे सरकारने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, यामुळे आज संपूर्ण राज्यात उत्साही वातावरण आहे, आपली परंपरा व संस्कृती जपण्याचा वेगवेगळा प्रयत्न व कृती विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून सुभाष साळुंके परिवार करीत आहेत गणेशोत्सव मध्ये मूर्तींचे पावित्र जपणे, श्री मूर्तींचे विधिवत व स्वच्छ पाण्याच्या ठिकाणी जवळच्या जवळ विसर्जन व्हावे, याकरिता अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्याने सुभाष साळुंके यांच्या प्रभागातील राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान