पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

२०२२ ची होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी ओवे गाव येथे मोठ्या उत्साहात

इमेज
२०२२ ची होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी ओवे गाव येथे मोठ्या उत्साहात प्रतिनिधी आशा रणखांबे  ओवे, खारघर येथे, होपमिरर  चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईतील एक संस्था गरिबी कमी करण्यासाठी आणि ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि इतर कारणांसाठी कार्य करते. नुकतेच संस्थेने क्रिकेट सामन्यांचे  नियोजन केले होते. ग्रामीण आणि स्थानिक समुदायांमध्ये खेळांचा प्रचार आणि विकास करणे हे संस्थेचे ध्येय आहे. म्हणूण होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी विनामूल्य घेण्यात आली. यावेळी कल्याण, कर्जत, शहापूर आणि भिवंडी आदिवासी संघ या स्पर्धेत सहभागी झालेल्या १६  हून अधिक संघांचा समावेश होता. एक चॅरिटी शो सामना देखील झाला ज्यामध्ये भारतीय खेळाडू व्हीलचेअर क्रिकेट टीम चा सामना झाला . व्हीलचेअर क्रिकेट संघाला पाठिंबा देणे आणि त्याचा प्रचार करणे हे होपमिरर फाउंडेशन चे ध्येय आहे. तळोजा आणि खारघर पोलीस स्टेशन एक शो मॅच घेण्यात आला. विक्रांत पाटील, गुरु म्हात्रे, दिलशाद खान- संपादक मुंबई हलचल, शबनम शेख, अक्रम शेख, अयुब शेख यांची उपस्थित होती. या कार्यक्रमाचा शुभारंभ सचिनशेठ पाटील यांनी केला. रायगड समाल

अद्वैत थिएटर्स'चे २५ वे नाटक 'थँक्स डियर' रंगभूमीवर

इमेज
अद्वैत थिएटर्स'चे २५ वे नाटक 'थँक्स डियर' रंगभूमीवर        अद्वैत थिएटर्स, मोरया थिएटर्स व सर्वस्य प्रॉडक्शन या नाट्यसंस्थांनी मिळून निर्मिती केलेले 'थँक्स डियर' हे नाटक आता रंगभूमीवर आले आहे. या नाटकाचा २५ डिसेंबर रोजी पुण्यात शुभारंभ झाला असून, ३१ डिसेंबरला मुंबईत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. आतापर्यंत लोकप्रिय नाट्यकृती रंगभूमीवर आणणाऱ्या 'अद्वैत थिएटर्स'चे हे २५ वे नाटक आहे. निर्माते भाऊसाहेब भोईर, राहुल भंडारे व श्रद्धा हांडे यांनी संयुक्तरित्या या नाटकाच्या निर्मितीची सूत्रे सांभाळली आहेत.         या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन निखिल रत्नपारखी व तुषार गवारे यांनी मिळून केले आहे. निखिल रत्नपारखी व हेमांगी कवी हे कलाकार या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. श्रद्धा हांडे यांची वेशभूषा, उलेश खंदारे यांची रंगभूषा व गंधार यांचे संगीत अशी टीम या नाटकासाठी काम करत आहे. वर्षअखेरीस या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना 'थँक्स डियर' म्हणण्याची संधी

'साथ सोबत'चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

इमेज
'साथ सोबत'चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच उत्कंठा वाढवणाऱ्या 'साथ सोबत' या आगामी मराठी चित्रपटचा ट्रेलर एका दिमाखदार सोहळ्यात रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांना नेमकं काय पहायला मिळणार याचे संकेत देणारा आणि खऱ्या अर्थानं 'साथ सोबत'ची ओळख करून देणारा असा हा ट्रेलर आहे. १३ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'साथ सोबत'च्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचं काम केलं आहे. नेटकऱ्यांकडून ट्रेलरचं कौतुक होत असून, अत्यंत कमी वेळेत या ट्रेलरला खूप लाईक्स मिळत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी 'साथ सोबत'चा ट्रेलर शेअर करत चित्रपटाच्या टिमचा उत्साह वाढवला आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये 'साथ सोबत'चा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला कलाकार-तंत्रज्ञांसह काही मान्यवरांनीही हजेरी लावली. प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या 'साथ सोबत' या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आमरण उपोषण सुरू असतानाच रस्ते कामाला सुरुवात

इमेज
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आमरण उपोषण सुरू असतानाच रस्ते कामाला सुरुवात अंबरनाथ मधील फुलेनगर गुप्ता तबेला पासून जावसई रिक्षा स्टॅन्ड पर्यंतचा राहदारीचा डांबरीकरण रस्ता अर्धवट बनविण्यात आला होता तो रस्ता पूर्ण बनवून मिळावा या करिता प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने अंबरनाथ नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना अनेक वेळा पत्र व्यवहार करून मागणी केली असतानाही रस्त्याचे काम होत नव्हते दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष, आलम खान, कुशाल सोनकांबळे, दत्तात्रेय घोगरे, सोनू नायक, अभिमन्यू गुप्ता, सोनू चव्हाण, यांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि काही तासातच  महानगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी तात्काळ रस्ता दुरूस्तीला परवानगी देत रस्ता दुरूस्तीचे काम उपोषण सुरू असतांनाच सुरू केले तसेच अंबरनाथ येथील फुलेनगर मधील सर्व स्ट्रीट लाईटवर  जूने लाईट बदलून एलईडी लाईट सुद्धा सुरू करण्यात आल्या तसेच रस्ता कायमस्वरूपी बनवण्याकरीता २०२२-२०२३ मार्च २०२३ अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली असल्याबाबत पत्राद्वारे लेखी

जनहित न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने शाळकरी विद्यार्थी यांना वह्या व खाऊ वाटप

इमेज
जनहित न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने शाळकरी विद्यार्थी यांना वह्या व खाऊ वाटप  उल्हासनगर कॅम्प नंबर तीन चोपडा कोर्ट आंबेडकर नगर या ठिकाणी जनहित न्यूज महाराष्ट्र परिवाराच्या माध्यमातून व भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने 26 डिसेंबर 2022 रोजी शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आला  यावेळी भटके विमुक्त सामाजिक संस्था चे अध्यक्ष सुंदर डांगे, जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट, उपसंपादिका ज्योती पवार, प्रतिनिधी सुमन शेंडगे, उपस्थित होते __________________________________________ बेघर निवारा या ठिकाणी राहत असलेल्या वृद्ध महिलाना, एक हात मदतीचा  तसेच दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी जनहित न्यूज महाराष्ट्र चे वतीने उल्हासनगर कॅम्प नं 3 पर्णकुटी बेघर निवारा या ठिकाणी संपादक हरी आल्हाट उपसंपादिका ज्योती पवार यांच्या वतीने, तेल, तांदूळ ,साखर ,चाय पत्ती, तसेच पोहे , असे अल्प जमेल तेवढे राशन देऊन बेघर निवारा

उल्हासनगर पालिकेचे 200 बेडचे हॉस्पिटल सध्या धुळखात..

इमेज
उल्हासनगर पालिकेचे 200 बेडचे हॉस्पिटल सध्या धुळखात.. कल्याण मुरबाड महामार्गावर आणि म्हारळगावासमोर बांधण्यात आलेले उल्हासनगर पालिकेचे सुमारे 200 बेडचे हॉस्पिटल सध्या धुळखात पडले आहे, याचे ना उद्घाटन ना या करिता स्टाफ नियुक्त केला नसल्याची खात्रीलायक माहिती असून सध्या देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची टांगती तलवार असताना हे असे 'धुळखाणे' कितपत योग्य आहे, याचा लोकप्रतिनिधी सह,सत्ताधारी आमदार, खासदार, नेते, पुढारी, यांनी विचार करायला हवा. कल्याण मुरबाड महामार्गाशेजारी आणि म्हारळ गावाच्या प्रवेशद्वारासमोर उल्हासनगर पालिकेने सुमारे 200 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल बांधले याला आज दिड ते दोन वर्षे व्हायला आलीत, हे हॉस्पिटल कल्याण मुरबाड महामार्गावर असल्याने येथे उपचारासाठी येण्याजाण्याची खास सोय आहे, शिवाय म्हारळ, वरप, कांबा या वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी हे रुग्णालय अतिशय उपयुक्त ठरणार आहे याशिवाय सध्या देशासह राज्यावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकट घोंघावत आहे, मुंबई पुणे, आदी शेजारच्या शहरामध्ये कोरोनाचे एक्टिव पेंशट सापडत आहेत, मागील कोरोना काळातील अनुभव पाहता

डायलिसिससाठी महिलेला युवा सेनेची मदत

इमेज
 पुणे: डायलिसिससाठी महिलेला युवा सेनेची मदत पुणे (प्रतिनिधी सुनील वाल्हेकर )  पालिकेकडून रुग्णालयांना मिळणारा निधी मिळणे बंद झाल्यामुळे डायलिसिससाठी पैसे शिल्लक नसलेल्या माधुरी विसवे यांच्या मदतीला पुणे शहर युवासेना धावून गेली आहे. शिवसेना नाना पेठ मुख्य शाखेच्या वतीने त्यांना मदत म्हणून १ महिन्याचे डायलिसिसचे सर्व साहित्य आणि १ महिन्याची संपूर्ण औषधे देण्यात आली. युवासेना समन्वयक युवराज रामभाऊ पारीख, शिवसेना पुणे शहर संघटक राजेंद्र शिळीमकर, युवासेनाचे शहर अधिकारी राम थरकुडे, सनी गवते, परेश खांडके, गौरव पापळ, दक्षेश कुरपे, ऋषभ नानावटी, हर्षट बिबवे, अक्षय बद्रे, रोहित शिवसरण, विशाल बोझे, नीलेश जगताप, शुभम दुगाणे, रमेश क्षीरसागर, अभिजित ताठे, प्रवीण रासकर आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील वाल्हेकर जनहित न्युज महाराष्ट्र पुणे

अंबरनाथ : बाळासाहेबांची शिवसेना युवा सेना महिला आघाडी यांनी आनंद परांजपे व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.

इमेज
अंबरनाथ : बाळासाहेबांची शिवसेना युवा सेना महिला आघाडी यांनी आनंद परांजपे व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.   अंबरनाथ: 24 डिसेंबर 2022 महाराष्ट्राची चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची वारंवार बदनामी करत असल्याबद्दल नागरिक शिवसैनिक यामध्ये प्रचंड नाराजी व तीव्र रोष निर्माण झालेला आहे. समाजामध्ये बदनामी निर्माण करण्याचा व  द्वेष पसरविण्याचे काम करणाऱ्या आनंद परांजपे व त्यांचे दहा ते बारा सहकारी यांच्याविरुद्ध  पोलीस फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी अंबरनाथ मधील बाळासाहेबांची शिवसेना, युवा सेना महिला आघाडी यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत तसेच अंबरनाथ पश्चिमेकडील पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असल्याची माहिती माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी दिली ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729