उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित
उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित दि.28/04/2023 उल्हासनगर: दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींना Online दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देशप्राप्त झाले त्याअनुषंगाने आज दिनांक 28/04/2023 रेाजी महापालिका महासभागृह येथे दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID देण्याबाबत दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये उल्हासनगर क्षेत्रातील मनपा शाळा, खाजगी शाळा, अनुदानीत शाळा, विना अनुदानीत शाळांमधील मुख्यध्यापक तसेच दिव्यांग सेवा संस्थांच्या पदधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मध्ये सुमारे 200 त 250 मुख्यध्यापक व विविध संस्थांचे एन.जी.ओ. उपस्थित होते. श्री. भारत वेखंडे, जिल्हा सम्नवयक, डायट, रहाटोली, तसेच व श्री. नारायण भालेराव यांनी यु.डी.आय.डी. व यु डाईस प्लस बाबत मार्गदार्शन केले आहे.