उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला
( प्रतिनिधी ज्योती पवार )
उल्हासनगर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख साहेबांच्या सौजन्याने व मार्गदर्शनाने त्यांचे वाहन चालक सुधाकर क्षीरसागर तसेच शिपाई श्रीमती मंदा आल्हाट
दिनांक 28 मार्च 2024 रोजी महानगरपालिका मधून सेवानिवृत्त झाले आहेत.
उल्हासनगर महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले माननीय आयुक्त साहेबांचे वाहन चालक सुधाकर क्षीरसागर व शिपाई श्रीमती मंदा आल्हाट यांचे सेवा निवृत्तीचे समारोप कार्यक्रम स्थायी समिती हॉल येथे घेण्यात आले
सदर कार्यक्रम माननीय आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख साहेबांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले आहे.यामध्ये अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर ,उपायुक्त डॉ सुभाष जाधव , सहाय्यक संचालक ललित खोब्रागडे , मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख , प्रशासनाधिकारी दीपक धनगर ,मनीष हिवरे, राजेश घनघाव , शांताराम चौधरी उपस्थित होते.
तसेच निरोप समारंभ देताना सचिव प्राजक्ता कुलकर्णी ,समग्र शिक्षा अधिकारी श्रीमती संगीता लहाने यांनी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या बद्दल प्रोत्साहत्मक प्रेरणादायक मार्गदर्शन केले
व तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आयुक्त तथा प्रशासक यांनी मंदा आल्हाट यांना दिव्यांग मुलांकरिता काम करण्याबाबत मार्गदर्शन केले व आपण आपले पुढचे आयुष्य दिव्यांग बांधव करिता व्यतीत करावे असे सौजन्य पूर्वक आपल्या भाषणात माननीय आयुक्त अजिज शेख यांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्कृष्टरित्या माननीय आयुक्त साहेबांद्वारे साजरा करण्यात आलेउप संपादिका ज्योती पवार बातमी जनहित/जनहित न्युज महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद