उल्हास नदीच्या पाण्याचा लालसर रंग; कर्जतच्या चिल्हार नदीकाठावरील बेसुमार डोंगर कटिंग आणि मातीचा भराव कारणीभूत?
उल्हास नदीच्या पाण्याचा लालसर रंग; कर्जतच्या चिल्हार नदीकाठावरील बेसुमार डोंगर कटिंग आणि मातीचा भराव कारणीभूत ? उल्हास नदी बचाव कृती समिती आणि पर्यावरणप्रेमींची प्रत्यक्ष पाहणी अभिनंदन लोधा प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व उत्खनन उघड वैज्ञानिक तपासणीची आणि संयुक्त पंचनाम्याची मागणी बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून अचानक उल्हास नदीचे पाणी लालसर व गढूळ झाले होते उल्हास नदीच्या गढुळ पाण्याची बातमी सुद्धा प्रसारित झाली होती उल्हास नदीच्या पाण्याचा नेमका स्रोत शोधण्यासाठी उल्हास नदीच्या वरच्या प्रवाहापासून विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान कर्जतजवळील पिंपळोळी परिसरातील चिल्हार नदीकाठावर सुरू असलेले अभिनंदन लोधा कंपनीचे १८० एकर क्षेत्रातील प्लॉटिंग प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणातील डोंगर कटिंग हा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वैज्ञानिक तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उल्हास नदी बचाव कृती समितीने केली आहे. डोंगर कटिंग व भुस्खलनाचा धोका पिंपळोळी परिसरा...