पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कळवा मुंब्रा दिवा व कल्याण रेल्वे स्थानकाचा डी आर यु सी सी कमिटी सदस्य सुभाष साळुंके यांनी केला पाहणी दौराकल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे अंबरनाथचे नगरसेवक व मध्य रेल्वे च्या DRUCC समिती सदस्य सुभाष नारायण साळुंके यांनी मध्य रेल्वेच्या कल्याण, कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकाच्या स्टेशन प्रबंधक व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी दौरा करत स्थानकातील विविध समस्या जाणून घेतल्या, त्यानंतर स्थानकातील स्टेशन प्रबंधक व अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार घेतलीया बैठकीत प्रवाशांना होणाऱ्या समस्या व गैरसोयी तातडीने सोडविण्यात यावे असे सुभाष साळुंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले तसेच अधिकारी वर्गाकडून रेल्वे स्टेशन व प्लॅटफॉर्म बाबत अडचणी समजावून घेतल्याया वेळीकल्याण स्टेशन प्रबंधक अनुपमकुमार जैन उपप्रबंधक जे एन झा, RPF इन्चार्ज बामणे साहेब खासदार रेल्वे प्रवाशी समन्वय समितीचे रविंद्र उतेकर कळवा स्टेशन प्रबंधक विनोद के खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समितीचे सदस्य विजय देसाई, श्रीमती निर्मला ठाकुर .आशिष मांजरेकर तसेचमुंब्रा स्टेशन प्रबंधक प्रकाश चाचारिया खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समिती चे किशोर मोहिते कासार, राजकुमार जमखंडीकर दिवा रेल्वे स्टेशन प्रबंधक मनोज कुमार गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर,पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते कल्याण,कळवा,मुंब्रा,दिवा रेल्वे स्टेशनमध्ये आवश्यक सोयीसुविधा निर्माण करणे,पुरेशी स्वच्छतागृहे व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.तसेच रेल्वे स्टेशन परिसर, प्लॅटफॉमवर असलेली अस्वच्छता,दुर्गंधीयुक्त व कचरामुक्त परिसर करणे,रेल्वे प्रवाशांना योग्य सोयी सुविधा पुरविणे, महिला प्रवाशांच्या सुरक्षितेकरिता प्रत्येक स्टेशनवर महिला डब्बा लगत महिला किंवा पुरुष कॉन्स्टेबलची गस्त वाढविणे व गुन्ह्याचे प्रमाण रोखण्याकरिता आरपीएफ सुरक्षाबलात वाढ करण्याची गरज असल्याचे ही सुभाष साळुंके यांनी सांगितले. पाहणी केलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक यांना माहिती देऊन अवगत केले जाणार आहे.

इमेज

उल्हासनगर येथे प्रांत कार्यालयात पत्रकार कक्ष द्या - पत्रकार सुरक्षा समितीची मागणी उल्हासनगर शहरात शासकीय निमशासकिय कार्यालय आहेत या कार्यालया कडून कोणती ही प्रेस नोट अथवा माहिती मिळत नाही तर उल्हासनगर महापालिकेत पत्रकार कक्ष असून शहरातील महसूल विभागाच्या सर्व घडामोडी प्रांत कार्यालयातुन होतात मात्र त्या ही कार्यालयातुन पत्रकाराना योग्य माहिती मिळत नाही तसेच तहसिलदार कार्यालयाची नवीन इमारत तयार आहे प्रांत कार्यालयाची सुध्दा इमारत तयार झाली आहे या दोन्ही कार्यालया पैकी एका कार्यालयात पत्रकार कक्ष त्या ठिकाणी द्या अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष रामेश्वर गवई यांनी उल्हासनगर येथे उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांना निवेदन देण्यात आले तसेच या निवेदना प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे तालुका अध्यक्ष रामेश्वर गवई , उपाध्यक्ष सलिम मंसुरी , महासचिव सुरेश जगताप , सदस्य अशोक एफ शिरसाट , विजय सिंग , हरि आल्हाट, यांच्यासह आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते

इमेज

*ओबीसींची जनगणना करण्यात सरकारला रस नाही* : डॉ.सुरेश माने ठाणे (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जी काही सरकारं आली त्यापैकी कोणालाही ओबीसी समाजाची जनगणना करावी असे वाटत नाही, त्यांची ओटब्यांक तूटण्याची त्यांना भीती वाटते, देशातील जनावरांची जनगणना होत असते परंतु ओबीसींची होत नाही हा मोठा गहन प्रश्न आहे, असे प्रतिपादन फूलेशाहुआंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत घटनातज्ञ डॉ.ॲड. सुरेश माने यांनी केले, नवनिर्माण बहुजन फोरमच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश माने बोलत होते, डॉ.आंबेडकर रोड येथील बुद्ध विहार हॉल येथे आयोजित या आरक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी नेते धनाजी सुरोसे होते,डॉ.माने मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेल्या अनुसुचित जाती जमाती आरक्षण मंत्री गट समिती चे एससी सदस्यांनी समितीचे राजिनामे द्यायला हवेत, त्यांना विचारले जात नसेल आणि गृहीत धरून अजीत पवार परस्पर पदोन्नती रद्द करण्याची जी आर काढतात तर तूम्ही पदावर राहताच कशाला असा ही सवाल त्यांनी उपस्थित केला, मराठा आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा संशोधनात्मक इतिहास सांगून मोठ्या प्रमाणात होणार्या शेतकरी आत्महत्या त्यांची कारणे, मराठा आरक्षणाची गरज या विषयावर सखोल मार्गदर्शन कायदेतज्ज्ञ डॉ.सुरेश माने यांनी केले, ओबीसी नेते धनाजी सुरोसे नवनिर्माण बहुजन फोरमचा उद्देश सांगताना यावेळी म्हणाले की, ओबीसी समाजामध्ये आपला हक्क आणि मौलिक अधिकार या बाबत मोठी उदासिनता दिसून येते, हि जनजागृती करण्यासाठी फोरमच्या माध्यमातून ओबीसी एससी एसटी मायनोरिटी भटक्या विमुक्त समाजाला जोडण्याचे काम हाती घेतले आहे,गेली दहा पंधरा वर्षांपासून ठाणे शहरातील फूले शाहू डॉ आंबेडकरी चळवळीतही मोठी पोकळी निर्माण झाली आहे,नविन तरुणांना पुढे आणले पाहिजे, चळवळीतील कार्यकर्ते चळवळीला पोषक नसलेल्या राजकीय पुढार्यांच्या मागे वेळ वाया घालवत आहेत, बहुजन समाजातील सर्व घटकांना एकत्र करून भविष्यातील सामाजिक, राजकीय घडामोडीतून बहुजन चळवळीच्या हातात काही चांगलं यश यायला हवे, त्यासाठी हा फोरम काम करणार आहे,डॉ.सुरेश माने यांनी दिप प्रज्वलन करून परिषदेला सुरुवात केली, जेष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर, ओबीसी विचारवंत राजाराम ढोलम, डॉ.विजय पवार यांनीही यावेळी आपले विचार मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते राहुल कांबळे यांनी केले, उपस्थित जेष्ठ मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,या आरक्षण परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी निमंत्रक जयंत किर्तने, ॲड.सचिन कांबळे, जस्टिन राजू, बालाजी मसुरे यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.

इमेज

200 दिव्यांगों को वेक्सीनेशन के लिये मुफ्त परिवहन सेवा...आज मंगलवार 22 जुन को।सेंचुरी रेयान स्कूल में दिव्यांग बंधुओं के लिए विशेष वेक्सीनेशन टीकाकरण सत्र उल्हासनगर मनपा द्वारा आयोजित किया गया, टीका लगवाना चाहने वाले 200 दिव्यांग भाई बहनों के लिये स्वयंसेवक के साथ उनको लाने ले जाने की मुफ्त परिवहन व्यवस्था और अन्य सहायता आईआईएफएल संस्था, सोहम फाउंडेशन एनजीओ टिम और उल्हासनगर के समाजसेवी सोनु विशनानी द्वारा की गई।

इमेज

*पदोन्नती मधील आरक्षण मिळवण्यासाठी विविध संघटनेची बैठक संपन्न*( आशा रणखांबे) कल्याण/ ठाणे दि.२१ रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ठाणे जिल्हा, ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ , महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना यांची संयुक्तिक सभा संजय थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह कल्याण येथे संपन्न झाली.

इमेज

उल्हासनगर में भी फिरा बुलेट साइलेंसर पर बुलडोजर...उल्हासनगर कैम्प 3 शिवाजी चौक पर आज पटाखों जैसे आवाज़ करने वाले साइलेंसर पर बुलडोजर फिराया गया,उक्त अवसर पर ठाणे जिला यातायात विभाग के उपायुक्त श्री बाळासाहेब पाटील व उल्हासनगर यातायात विभाग के सहायक आयुक्त श्री तोतेवाड जी अपने अधिकारियों कर्मचारियों के साथ उपस्थित रहे,ध्वनि प्रदूषण के ख़िलाफ़ कार्यरत उल्हासनगर की समाजसेवी संस्था हिराली फाउंडेशन द्वारा पत्रव्यवहार करके पोलिस आयुक्त, उपायुक्त महोदय से कारवायी करने की मांग की गई थी।

इमेज

उल्हासनगर महानगरपालिका द्वारा अन्याय और अत्याचार के खिलाफ व्यापारियोमे नाराजगी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट के बावजूद उल्हासनगर मनपा द्वारा श्री हरि कॉम्प्लेक्स सनमुख सदन उल्हासनगर -2 के पीछे, उ म पा द्वारा ध्वस्त कर रहे है, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट कहता है कि भवन स्थिर मरम्मत योग्य है और इसे खाली करने की आवश्यकता नहीं है।स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट C 2 कैटेगरी के तहत निर्माण दिखाती है, फिर उ म पा ने यह कदम कैसे उठाया?अवैध रूप से गिराई जा रही सी 2 बी श्रेणी की इमारतभवन पूरी तरह से खाली हैसदस्य यह लिखित में देनेको तैयार हैं थे कुछ भी हुआ जिसके लिए उन्होंने उत्तरदायी ठहराया, बावजूद इमारत को ढहाया जा रहा है।इसीलिए जस्टिस फ़ॉर श्रीहरी कॉम्प्लेक्स के नामके बोर्ड लेकर उ म पा द्वारा अन्याय और अत्याचार के खिलाफ व्यापारी लामबन्द हुये।

इमेज

पत्रकारांसाठी लोकल ट्रेन सुविधा सुरु करा अन्यथा 24 ता .ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार ......मुनीर खान कोेरोना महामारी च्या काळात अनेक पत्रकारांनी आपल्या जीवाची बाजी लावून सरकारच्या प्रत्येक गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम व सर्व माहिती जनते पर्यंत पोहचवले तसेचया अहोरात्र कष्ट केले आहे तसेच दुर्दैवाने काही पत्रकारांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे तरी सुद्धा सरकारने पत्रकारांसाठी कुठल्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत ही मोठी खंत आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अस्तित्वात असणारे पत्रकार यांना वाऱ्यावर सोडलं असं काम सरकारने केल आहे यासाठी सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आमरण उपोषणाला बसणार अशी माहिती ठाणे जिल्हा पत्रकार रक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष मुनीर खान यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे पत्रकारांच्या विविध मागण्या त्या पत्रात समाविष्ट करण्यात आल्या आहेतशहरी पत्रकारांचे मुलभूत प्रश्न व उपेक्ष पत्रकार रक्षक सेना ठाणे जिल्हा यांच्या वतीने आम्ही सर्व पत्रकार बंधू आमच्या न्याय व हक्कासाठी निवेदने ,धरणे व आंदोलने केले आहे . ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार असुरक्षित ,अत्यंत विपरीत व हलाखीच्या परिस्थितीत काम करीत असून अत्यंत दुर्लक्षित , उपेक्षित जीवन जगत आहे . केंद्र व राज्य शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामूळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे . या सर्वाला सर्वस्वी केंद्र व राज्य सरकारच जबाबदार आहे . P. A आमच्या मागण्या 17-11-18 १ ) पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा किती तरी दिवसांपासून रखडलेला असून , या मसुद्यात पत्रकारिता क्षेत्रातील सर्वच पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे .२ ) राज्य सरकारने केवळ एकाच संघटनेला दत्तक घेतले का ? राज्यातील अन्य संघटनांना शासकीय विभागीय असुमित्यांचा वर्षासका नाही ? नेमलेली निष्क्रिय अधिस्विकृती समितीला मुदत वाढ देऊ नये . समितीवर अमल्यनीयोग्यतेनुसार नियुक्त्या करण्यात यावे . ३ ) अधिस्तिकृतीत अनेक जाचक अटी असल्याने ग्रामीण / शहरी भागातील पत्रकार अधिस्वीकृती पासून 11 वचत आहे.त्यामूळे अधिस्कृतीतील४ ) पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले ग्रामीण वार्ताहर , शहर बिट वार्ताहर , तालुका प्रतिनिधींना अधिस्विकृती त्यांच्या बातम्या व अनुभवाच्या आधारे देण्यात यावे.तसा अध्यादेश सरकारने जारी करावा . . ५ ) सर्वसाधारण शहरी / ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांना दहा वर्ष पत्रकारीतेचा अनुभव ग्राह्य धरून त्यांना अधिस्विकृती देण्यात यावी . ६ ) सर्वच माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचा कौटुंबिक सर्वे करा.तसेच सरसकट सर्व पत्रकारांची नोंदणी जिल्हा माहिती कार्यालयात अर्थात सरकारी दप्तरी व्हावी या संदर्भात आदेश पारीत करा . ७ ) सातत्याने आम्ही पत्रकार आमच्या मुलभूत मागण्यांसाठी पत्रव्यवहार , आंदोलने करतोय , प्रत्यक्षात लाभ मात्र सरकार नेहमी मुठभर अधिस्विकृती धारक पत्रकारांना देतात हे योग्य नाही . ८ ) पत्रकार पेन्शन योजनेचा लाभ फक्त मूठभर अधिस्विकृती धारक पत्रकारांना मिळते . खरी गरज आम्हा ग्रामीण / शहरी पत्रकारांना आहे . त्यामूळे पत्रकार पेंशन योजना सर्व पत्रकारांना लागू करा . तसेच पत्रकार पेंशन योजनेतील ६० वर्षे वयाची अट शिथील करून ५० वर्षे करण्यात यावी . ९ ) ग्रामीण व शहरी भागात सतत तीन वर्ष काम करणारे पत्रकार , वार्ताहरांना वृत्तपत्र संपादकाने लेटरहेडवर दिलेले अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरून त्यांना ५० टक्के बस प्रवास सवलत लागू करण्यात यावी . तसेच ही सवलत एक वर्षाकरीता देण्यात यावी आणि दरवर्षी या सवलतीचे नुतनीकरण करण्यात यावे . १० ) सरसकट सर्व पत्रकारांच्या कुटुंबियांना आरोग्य व मुला - मूलींच्या शिक्षणासाठी पर्याप्त योजना जाहिर कराव्यात . आमच्या समस्या व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याची कायदेशीर अमंलबजावणी करावी अशी मागणी आम्हा सर्व पत्रकार बंधूची आहे .

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक सुभाष साळुंके व सौ. सुवर्णा साळुंके यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कार्यक्रमांची रूपरेषा :1️⃣ अंनप वॉर्ड क्र.४४ व ४५ मधील सर्व सफाई कामगार व घंटागाडी कामगार यांना मोफत रेनकोट वाटप.दि.१९ जून २०२१ रोजी दु.१२ वा. संवाद जनसंपर्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून वॉर्ड क्र.४४ व ४५ मधील सर्व सफाई कामगार, मुकादम व घंटागाडी कामगार यांना पाऊसापासून बचाव होणेच्या दृष्टीने चांगल्या दर्जाचे रेनकोट टोपी व मास्क इ.चे मोफत वाटप करण्यात आले याप्रसंगी स्वच्छता निरीक्षक श्री. सुहास सावंत, विलास भोपी, पुंडलिक शेटे, संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके, मा. नगरसेवक श्री. तुळशीराम चौधरी, राजकुमार जमखंडीकर,सौ.आशा शहा, सौ. सुनंदा मांढरे, सौ.मनीषा मसणे, बळीराम पालांडे,श्याम राजगुरू, अविनाश पाटील उपस्थित होते. यावेळी सुभाषसाळुंके यांच्या वतीने सातत्याने सहकार्य व मदत मिळत असल्याबद्दल कामगारांनी समाधान व्यक्त केले 2️⃣ ५५ जेष्ठ नागरीक शासकीय कार्ड मोफत वाटप शिबीर दि.२० जून २०२१ वेळ : स.११ ते दु.२ वा ठिकाण मा. सुभाष साळुंके यांचे शिवसंवाद जनसंपर्क कार्यालय,साकेत बिल्डिंग, रोटरी क्लब समोर,वडवली विभाग वाॅर्ड क्र. ४४ व ४५ मधील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकानी आपल्या आवश्यक कागद पत्रासह उपस्थित राहुन लाभ घ्यावा 3️⃣ दि. २१ जून २०२१ वेळ : स.११ ते २ वाजे.निराधार पेन्शन योजना शिबिर विधवा, घटस्फोटित महिला, निराधार नागरीक यांच्यासाठी संजय गांधी, श्रावण बाळ शासकीय पेन्शन योजना शिबिर ठिकाण शिवसांवद जनसंपर्क कार्यालय, रोटरी क्लब हॉल समोर4️⃣ दि.२७ जून २०२१ वाॅर्ड क्र.४४ व ४५ मधील घरकाम करणाऱ्या महिलांकरिता छत्री वाटप व घरेलू कामगार सर्टिफिकेट वाटप (फक्त नोंदणी केलेल्या महिलांसाठी) वेळ : स.११ ते १ वा.ठिकाण शिवसंवाद जनसंपर्क कार्यालय, साकेत बिल्डिंग, रोटरी क्लब हॉल समोर5️⃣ दि.२८ जून २०२१ वाॅर्ड क्र. ४४ मधील जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप वेळ : स.११ वा ठिकाण सुभाष साळुंके यांचे *संवाद जनसंपर्क कार्यालय, रायगड बिल्डिंग समोर वडवली(वॉर्ड क्र.४४ मधील कूपन धारक नागरिकांनीच उपस्थित रहावे.)6️⃣ दि.२९ जून २०२१ वाॅर्ड क्र. ४५ मधील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप वेळ : स.११ वाजता ठिकाण शिवसंवाद जनसंपर्क कार्यालय, साकेत बिल्डिंग, रोटरी हॉल समोर (वॉर्ड क्र.४५ मधील कूपन धारक नागरिकांनीच उपस्थित रहावे 7️⃣ दि.९ व १० जुलै २०२१ इ.१० वी, १२ वी व पदवी नंतर पुढे काय ? विद्यार्थ्यांकरीता E-करियर व्याख्यानमाला (सातत्यपूर्ण आयोजनाचे १८ वे वर्ष) वेळ : सायं.५ ते ७ वाजेपर्यंत Online Platform : YouTube (याबाबत सविस्तर माहिती, लिंक दिली जाईल.) वरील सर्व आयोजनाचा संबधित नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळून लाभ घ्यावा. अशी विनंती आयोजक:सुभाष नारायण साळुंके नगरसेवक सदस्य: DRUCC,मध्य रेल्वे सौ सुवर्णा साळुंके अध्यक्षा: संवाद फाऊंडेशन यांनी केली

इमेज

ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर स्थित एकमात्र सिद्धान्त समाज विकास संस्थेची कोविड योद्धा प्रशिक्षणा साठी निवड... प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानी देशभरातील प्रशिक्षण केंद्रांचे लाईव्ह उद्‌घाटन केले...उल्हासनगर - देशात येणाऱ्या संभाव्य कोरोना लाटेला टक्कर देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात एक लाखाहून अधिक कोरोना योध्दा प्रशिक्षित करण्यात येत आहेत, या साठी संपुर्ण देशभरातील २६ राज्यात एकूण १११ प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या पैकी महाराष्ट्रात ८ सेंटरची निवड करण्यात आली आहे या पैकी ठाणे जिल्हातील एकमात्र उल्हासनगर स्थित सिद्धांत समाज विकास संस्थेची या प्रशिक्षण केंद्रासाठी निवड करण्यात आली असल्याने या निवडीमुळे उल्हासनगर महापालिकेच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे,गेली ३० वर्षाहून अधिक काळ सुशिक्षित व बेरोजगार युवक युवतींना राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देउन आपल्या सामाजिक कार्याची छाप राज्य शासन दरबारी उठविणाऱ्या सिद्धांत समाज विकास संस्थेत आज पर्यंत अनेक युवतींना नर्सेसचा कोर्स देउन त्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविले आहे, संस्थेच्या या अनुभवाची दखल घेत राज्य शासनाच्या शिफारसी नुसार या संस्थेची पैरामेडिकल क्रैश कोर्स साठी निवड करण्यात आली आहे .देशभरात सुरु होणाऱ्या १११ पैरामेडीकल कोर्स सेंटरचे औपचारीक उद्‌घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हा उद्घाटन सोहळा दुरदर्शवर लाईव्ह टेलीकास्ट झाला असून उल्हासनगरच्या सिद्धांत समाज विकास संस्थेचाही सहभाग होता, या सहभागात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तीशः या संस्थेची कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी संस्था सदस्यां बरोबर संवाद साधला,या प्रशिक्षण संस्थेत कोवीड महामारीत नागरीकांचे जीव वाचविण्यासाठी सहा प्रकारचे कोर्स डिझाईन करण्यात आले आहेत, या मध्ये होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, एडवांस केअर सपोर्ट, इमरजेंसी केअर सपोर्ट, सँपल केअर सपोर्ट या बरोबरच इक्वीपमेंट सपोर्ट चे पण प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सिद्धांत समाज विकास संस्थेचे संस्थापक संचालक सत्यवान माणिक जगताप यांनी दिली

इमेज

अंबरनाथ आज दिनांक १९ जून रोजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वतीने शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त वॉर्ड क्र.४४ व ४५ मधील सर्व सफाई कामगार, मुकादम व घंटागाडी कामगाराना रेन कोट.टोपी व मास्क चे मोफत वाटप करण्यात आलेयावेळी स्वच्छता निरीक्षक सुहास सावंत, विलास भोपी, पुंडलिक शेटे, संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा ताई साळुंके, नगरसेवक तुळशीराम चौधरी, राजकुमार जमखंडीकर,आशा शहा. सुनंदा मांढरे.मनीषा मसणे, बळीराम पालांडे उपस्थित होतेसुभाष साळुंके यांच्या वतीने कामगारांना सहकार्य व मदत मिळत असल्याबद्दल कामगारांनी आभार व्यक्त केले

इमेज

ठाण्यात धरणे प्रदर्शन

इमेज
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिना निमित्त ओबीसी स्थानिक संस्था राजकिय आरक्षण व मुस्लिम समाज शैक्षणिक आरक्षण समर्थ नार्थ जाहिर धरणे प्रदर्शन आज ठाणे येथे संपन्न झाले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व प्रा चंद्रभान आजाद यानी केले.

उल्हासनगर मध्ये 15 लाख 64 हजार रुपयाच्या गुटख्या सह तीन आरोपी अटकेत

इमेज
 विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गुरु संगत दरबार उल्हासनगर कॅम्प नंबर 4 या ठिकाणी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक  करीत अमली पदार्थांचा काळाबाजार सर्रास पणे सुरू होता अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली असता माहितीच्या आधारे पहाटे 4 वाजेच्या सुमारास सहआयुक्त समाधान पवार. सहाय्यक आयुक्त रमेश जाधव. दक्षता व गुप्तवार्ता अन्नसुरक्षा अधिकारी अरुणा वीरकायदे. यांच्या पथकाने पोलीस पथकासह सापळा रचून पहाटे 4 च्या दरम्यान धाड टाकली असता गुटख्याने भरलेला एक ट्रक. एक कार टेम्पो आणि तीन चाकी रिक्षा पकडली व कुख्यात गुटखा माफिया दिलीप वलेच्या आणि निलेश डिंगरा यांच्यासह गाडी चालक दत्तात्रेय एकशिंगे. जयेश हरेशलाल गुलाबानी. आणि सोमनाथ फुलमाळी यांना अटक करण्यात आली यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. गुटखा व अमली पदार्थ ट्रक मधून आणून तो रिक्षा टेम्पो अशा छोट्या वाहनांमधून  शहरात  विक्री केला जात होता  गाड्या मधून 15 लाख 64 हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न औषध प्रशासन पथकाने हस्तगत करून विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

कल्याण मध्ये केडीएमसीने केली अतिधोकादायक इमारतीवर कारवाई

इमेज
 कल्याण मधील केडीएमसीच्या हद्दीत विश्वास विद्यालय ची इमारत ही मालक बाळाराम पावशे  यांची हनुमान नगर ड प्रभागात अतिधोकादायक परिस्थितीमध्ये होती इमारत दोन मजली असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या आदेशानुसार व विभागीय आयुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनानुसार ही इमारत हातोडा व इलेक्ट्रिक ब्रेकर च्या साह्याने निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येत आहे सदर इमारत अतिधोकादायक असल्यामुळे केडीएमसी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत  अशी माहिती प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी दिली

उल्हासनगर अंध अपंग व्यक्ती को मदत

इमेज
ब्लाइंड वेलफेयर एसोसिएशन उल्हासनगर के श्री जगदीश पटेल की अपील के अनुसार सुरदासों के परिवार व बच्चों के लिये उल्हासनगर के सिटिज़न फाउंडेशन द्वारा नोटबुक्स, पेंसिल पेन, छाते और बनानी आश्रम के श्री तुलसी जी द्वारा दी गयी आर्सेनिक एल्बम30 की गोलियाँ 250 दृष्टिहीन परिवारों में आबंटित की गई, बरसात से बचाव के लिए उल्हासनगर जागरूक ग्रुप के सदस्य व्यापारी श्री राज खानचंदानी द्वारा लोगों के लिये बरसाती प्लास्टिक दिये गये।

उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती 4 मध्ये विकास परशुराम पाटील यांची सभापती या पदावर निवड

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका मध्ये  प्रभाग समिती सभापती पदाची ची निवडणूक  दिनांक 16 जून रोजी पार पडली या निवडणुकीमध्ये उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती 4  मध्ये मा. विकास परशुराम पाटील यांची सभापती या पदावर निवड झाल्या बद्दल जनहित न्यूज  महाराष्ट्र चैनल चे संपादक हरी आल्हाट तसेच विलास काकडे यांनी प्रभाग समिती क्रमांक 4 मधील नव नियुक्त सभापती मा. विकास परशुराम पाटील यांचा सत्कार करण्यात केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या  यावेळी संतोष पाटोळे. विकास कडू. प्रल्हाद कडू. विनोद भोईर उपस्थित होते

विश्व कल्याण फाउंडेशन की ओर से जरूरत मंद व्यक्ति को राशन की मदत

इमेज
उल्हासनगर विश्व कल्याण फाउंडेशन द्वारा  आज एक जरूरत मंद परिवार को राशन  की मदत देकर अपना कर्तव्य निभाया.  राज्य मे लॉकडाउन को स्थिरता भले ही दी गई हो लेकीन बिमार और जरुरत मंदो की मुशकीले कम नही हो रही है.  इसी का ध्यान रखकर विश्व कल्याण फाउंडेशन के संस्थापक विक्की वाघेला और करण तेजी. रवी मिश्रा. गौरव पांडे.शंकर  गुप्ता. रवी करोतीया इन्होने इन्सानियत का कर्तव्य निभाया है  और कहा है कि अगर शहर में ऐसे कोई जरूरत मंद है तो विश्वकल्याण फाऊंडेशन से जरूर संपर्क करे +91 88578 53800/8975143653  ऐसी जानकारी रवी करोतिया इन्होने दि

आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव

इमेज
मागील आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात तोक्ते चक्रीवादळाने थैमान घातले होते  यावेळी उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब तसेच रस्त्यावरील मोठी झाडे पडली होती  अनेक रस्त्यावर पाणी साचले व पाणी ओसरल्यानंतर वाहत आलेल्या कचऱ्याचे ढिगारे पडले होते  अशा परिस्थितीमध्ये उल्हासनगर शहरातील महावितरण विभाग. उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन विभाग.  तसेच उल्हासनगर महानगरपालिका सफाई कामगार यांनी तोक्ते चक्रीवादळाच्या संकटात सुद्धा नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन आपले कर्तव्य बजावले  अशा अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार मा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त  लालगड शाखा व समृद्धी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.  उल्हासनगर महानगरपालिका अग्निशामक दलाचे बाळासाहेब नेटके व त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला .  तसेच महावितरण अधिकारी दिलीप कुमार कुंभरे आणि त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.  ह्याच सोबत महापालिका विधुत विभागचे हनुमंत खरात यांचा व त्यांचे अधिकारी व कर्मचारी त्यांचाही सत्कार करण्यात आला.  उल्हासनगर

उल्हासनगर मधील धोकादायक इमारतीवरील टॉवर त्वरित हटवा

इमेज
उल्हासनगर मधील धोकादायक इमारतीवरील टॉवर त्वरित हटविण्यात यावे : आमदार कुमार आयलानी  उल्हासनगर मधील धोकादायक इमारतीवरील टॉवर त्वरित हटविण्यात यावे असे निवेदन पत्र उल्हासनगर चे आमदार कुमार आयलानी यांनी दिनांक 14 जून रोजी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त  यांना दिले असून  सध्या उल्हासनगर शहरात 505 इमारती या धोकादायक असून उल्हासनगर शहरात सतत इमारती ढासळत आहेत व त्यामध्ये जीवितहानी आणि होत आहे  यामुळे धोकादायक इमारतीवरील टॉवर त्वरित हटविणे गरजेचे आहे टॉवरच्या रेडिएशनमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचेही त्यांनी या पत्रात लिहिले  असून धोकादायक इमारतीवर टॉवर लागल्यास त्या इमारतीवरील वजन सुद्धा वाढत आहे यामुळे धोकादायक इमारत कोसळून  जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे तात्काळ इमारतीवरील टॉवर हटविण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे

उल्हासनगर शहरातील धोकादायक ईमारतींच्या प्रश्नाचे घोंगडे आपण अजून किती दिवस भिजत ठेवणार : आमदार राजु पाटील

इमेज
उल्हासनगर शहरातील धोकादायक ईमारतींच्या प्रश्नाचे घोंगडे आपण अजून किती दिवस भिजत ठेवणार : आमदार राजु पाटील यांचा प्रश्न... उल्हासनगर शहरातील धोकादायक ईमारतींच्या प्रश्नाचे घोंगडे आपण अजून किती दिवस भिजत ठेवणार अहात असा भावनिक प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी निवेदना द्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महापालिका आयुक्त डाॕ.राजा दयानिधी यांना विचारला आहे. ईमारत पडली की आम्ही हळहळ व्यक्त करतो पण पुढे काय ? असेही राजू पाटील म्हणाले एकाच आठवड्यात काही दिवसांच्या अंतराने उल्हासनगर 1 मधिल मोहिनी पॕलेस व नेहरू चौक येथील साईशक्ती ह्या 2 ईमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 निष्पाप नागरिकांचे बळी गेलेत. उल्हासनगर शहरात या अगोदर सुध्दा मागील 11 वर्षात 36 धोकादायक ईमारती कोसळून त्या मध्ये जवळपास 37 नागरिकांचे बळी गेले आहेत. अजून किती बळी गेल्यावर महापालिका प्रशासन धोकादायक इमारतीं बाबत निर्णय घेणार आहे असा खोचक प्रश्नही राजू पाटील यांनी प्रशासनाला विचारलाय. इमारत पडल्या नंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत कारण्यापेक्षा धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी जिवंतपनी काय करता येईल या बाबत विचार कराव

उल्हासनगर महानगर पालिका कचरा डंपिंग वर स्थानिक नागरिकांनी अडवील्या कचऱ्याच्या गाड्या उल्हासनगर महानगर पालिकेच्या कॅम्प नंबर 5 मधील कचरा डंपिंग ग्राउंडवर उल्हासनगर मधील कचरा टाकण्यात येतो सध्या पाऊस सुरू असताना पाण्याच्या प्रवाहात कचरा वाहून नागरिकांच्या घरात जात आहे यामुळे स्थानिक नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे असे स्थानिक नागरिक माहिती देत आहे आज दिनांक 12 जून 2021 रोजी सकाळ पासून स्थानिक नागरिकांनी कचरा डंपिंग वर येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून आंदोलन केले . उल्हासनगर ची लोकसंख्या पाहता उल्हासनगर महानगरपालिका कचरा डंपिंग करण्याकरिता पर्याप्त जागेची आवश्यकता आहे उल्हासनगर शहरात दोनच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड असून या दोन्ही ही ठिकाणी डम्पिंग ग्राउंड च्या परिसरात लोकवस्ती आहे प्रत्येक पावसाळ्यात डम्पिंग ग्राउंड च्या आसपास रहात असलेल्या नागरिकांना कचऱ्यामुळे त्रास सहन करावा लागतो तर दुसरीकडे उल्हासनगर शहराची लोकसंख्या पाहता व नागरिकांच्या तक्रारी पाहता उल्हासनगर महानगरपालिकेला शहरातील कचरा उचलणे ही गरजेचे आहे . शहरातील कचरा उचलला नाही तर उल्हासनगर शहरात घाणीचे साम्राज्य पसरते . आणि पावसाळ्यापूर्वी डम्पिंग वर कचऱ्याचे प्रमाण वाढले तर कचरा डंपिंग वरील घाणीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची संभावना असते अशा परिस्थितीमध्ये उल्हासनगर महानगरपालिका च्या सत्तेवर असलेल्या सत्ताधारी व उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी यांनी लवकरच हा प्रश्न सोडविण्यासाठी उपाय योजना करावी अन्यथा उल्हासनगर शहरात घाणीचे साम्राज्य पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही

इमेज