संकल्प प्रतिष्ठान* आयोजित *टिटवाळा महोत्सव - २०२४

संकल्प प्रतिष्ठान* आयोजित *टिटवाळा महोत्सव - २०२४
संकल्प प्रतिष्ठान* आयोजित *टिटवाळा महोत्सव - २०२४* अंतर्गत *लावणी कलावंत महासंघ* यांच्या माध्यमातून 
*लावणीसम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगांवकर* यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ *लावणीसम्राज्ञी विठा स्मृती चषक भव्य लावणी नृत्य स्पर्धा- पर्व चवथे २०२४* या स्पर्धेचे भव्य आयोजन टिटवाळा शहरात करण्यात आले होते... हि स्पर्धा *वयोगट ५ ते १५ वर्षे आणि वयोगट १५ वर्षे आणि पुढील वयोगटातील स्पर्धकांसाठी विनामुल्य* ठेवण्यात आली होती... सदर स्पर्धेची *अंतिम फेरी सोमवार दिनांक १५ जानेवारी, २०२४ रोजी टिटवाळा महोत्सवात* पार पडली... ज्यात दोन्ही गटात अंतिम फेरीत निवड झालेल्या प्रत्येकी १० स्पर्धकांनी सहभाग घेतला... लहान गटात प्रथम क्रमांक *काव्या जठार (पेण)* द्वितीय क्रमांक *श्राव्या पाटणकर (दिवा)* तर तृतीय क्रमांक *इशिका सिंघ (बदलापूर)* यांनी पटकावला... तसेच मुख्य गटात प्रथम क्रमांक *प्राची मोहिते (लालबाग)* द्वितीय क्रमांक *नेहा जाधव (सावंतवाडी)* तर तृतीय क्रमांक *राहूल काटे (नाशिक)* यांनी पटकावला... संपूर्ण स्पर्धेचे परिक्षण सन्माननीय परिक्षक *उल्का दळवी,गौरी जाधव, सुजाता कांबळे, विद्या सदाफुले* यांनी केले... सदर स्पर्धेचे सुत्रसंचालन *विकास सोनावणे* यांनी केले...

*लावणीसम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगांवकर* यांच्या स्मृतीदिनीच या स्पर्धेची अंतिम फेरी पाडली आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस या स्पर्धेच्या माध्यमातून लावणी कलावंत महासंघाच्यावतीने सांगितीक आदरांजली अर्पण करण्यात आली... सन्माननीय आयोजक *विजयभाऊ देशेकर* यांच्या मार्गदर्शनात लावणी कलावंत महासंघाचे *जयेश चाळके, कविता घडशी, विशाल सदाफुले, योगिता मोर्जे* आणि इतर पदाधिकारी यांनी सदर लावण्यसोहळा यशस्वी केला, अशी माहिती लावणी कलावंत महासंघाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष *संतोष लिंबोरे पाटील* यांनी जनहित न्युज महाराष्ट्र चे प्रतिनिधी गणेश तळेकर यांना दिली दिली...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप