पोस्ट्स

*उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्र. १७ मधून हरी चंदर आल्हाट निश्चितपणे अपक्ष लढणार!*

इमेज
*उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्र. १७ मधून हरी चंदर आल्हाट निश्चितपणे अपक्ष लढणार!*   *उल्हासनगर:आबासाहेब साठे*  उल्हासनगर महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १७ मधून एक महत्त्वाची घोषणा झाली आहे. स्थानिक जनसेवक श्री. हरी चंदर आल्हाट यांनी आगामी महापालिका निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याचा आपला निर्णय निश्चित केला आहे. श्री. आल्हाट यांनी घेतलेला हा ठाम निर्णय प्रभाग क्र. १७ मध्ये मोठी राजकीय चुरस निर्माण करणारा ठरणार आहे.  *नागरिकांसाठी लढणार!*  प्रभागातील नागरिक आणि समस्यांवर प्रकाश टाकताना श्री. हरी चंदर आल्हाट म्हणाले की प्रभागतील अनेक विकास कामे रखडली आहेत त्यांना पूर्ण करण्याची गरज आहे  १ ) पिण्याचे पाण्याची समस्याचे निवारण  २ )  ओला व सुका कचरा वेग वेगळा टाकण्यासाठी प्रभागात ठीक ठिकाणी व्यवस्था करणे  ३ )  कचरा उचलण्यासाठी प्रत्येक वस्ती मध्ये वेळेवर घंटा गाडीची वेळ निश्चित करणे  ४ ) सांडपाणी सुरूळीत वाहून जाण्यासाठी नाली व गटारे व्यवस्थित करणे व नाली वर ढाकणे बसविणे ५ ...

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

इमेज
जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप उल्हासनगर: जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर शहरात ३ डिसेंबर २०२५ रोजी 'दिव्यांग आधार सेवा संस्थे'च्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहकार्याने अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना पालिका ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले,  ज्यामुळे त्यांना महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. दिव्यांग आधार सेवा संस्थेने गेली दीड वर्ष केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, या ओळखपत्र वाटपामुळे शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना महापालिका परिवहन विभागाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.  आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी महापालिकेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीमती आव्हाळे मॅडम यांच्यासह दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त साहेब, दिव्यांग कल्याणकारी विभागाचे वरिष्ठ लिपिक, व...

आता ‘या’ नवीन तारखेला होणार अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक

इमेज
आता ‘या’ नवीन तारखेला होणार अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक (अंबरनाथ वृत्त) मतदान अवघ्या काही तासांवर असताना काही नगरपालिका आणि नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. या नगरपरिषदेची निवडणूक वीस दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे.नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील काही नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला होणारं मतदान आता थेट 20 डिसेंबरला होणार आहे. निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली.  तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सहा प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आलं आहे. कोणत्या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली? अंबरनाथ नगरपरिषेदतील प्रभाग क्रमांक 5 ब आणि प्रभाग 15 ब, प्रभाग क्रमांक 17 अ, प्रभाग क्रमांक 10 ब, प्रभाग क्रमांक 8 अ, प्रभाग 19 अ या प्रभागात नव्या कार्यक्रमानुसार निवडणूक घ्य...

सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे, कल्याणमधून एकाला अटक

इमेज
सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे, कल्याणमधून एकाला अटक मुंबई :केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ऑपरेशन चक्र अंतर्गत सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात देशभर मोहीम चालवली असून त्याअंतर्गत मुंबईसह देशभरात १० ठिकाणी छापे टाकले. त्यात कल्याण येथील कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली.                                सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सीबीआय ऑपरेशन चक्र अंतर्गत कारवाई करत आहे. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली, हिसार, लखनऊ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथील एकूण १० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. तपासादरम्यान कल्याण येथील एका आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. तो कल्याण येथील रहिवासी आहे. सायबर आर्थिक फसवणुकीत तो सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्याची चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना बेकायदा सिमकार्ड व बनावट कागदपत्...

महत्त्वाचा 'सर्वोच्च' निकाल! आरोपीच्या अटकेनंतर २ तासांत पोलिसांना सांगावी लागतील अटकेची कारणे, अन्यथा...; गुन्हा जामिनपात्र असेल तर आरोपीला सांगणे बंधनकारक

इमेज
महत्त्वाचा 'सर्वोच्च' निकाल! आरोपीच्या अटकेनंतर २ तासांत पोलिसांना सांगावी लागतील अटकेची कारणे, अन्यथा...; गुन्हा जामिनपात्र असेल तर आरोपीला सांगणे बंधनकारक.    सोलापूर : गुन्हा दाखल झाल्यावर कायद्याबाबत अनभिज्ञ लोक पोलिस अटक करतील म्हणून घाबरून जातात. पण, गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासांत संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे.त्या आरोपीला अटकेची कारणे समजावून सांगितल्याचे न्यायालयात सांगावे लागते. पोलिसांनी हा आदेश पाळला नाही, तर आरोपीची अटक किंवा रिमांड बेकायदा ठरेल, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. भारतीय न्याय संहितेनुसार अलीकडे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या अनेक गुन्ह्यांत संशयित आरोपींना शक्यतो अटक केली जात नाही. संबंधितांना नोटीस बजावून पोलिस चौकशीला बोलावतात, त्यानंतरही गरज वाटली तर त्या आरोपीस अटक करून पुढील तपास पोलिस करू शकतात.  दुसरीकडे, ६० वर्षांवरील आरोपीस अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यास पूर्वीचा गंभीर आजार असेल तर पोलिस शक्यतो अटक करत नाहीत. खास करून गुन्ह्यातील मुद्देमा...

सावकारी कर्ज आणि कायद्यातील तरतूद

इमेज
सावकारी कर्ज आणि कायद्यातील तरतूद  नंदुरबार महाराष्ट्र:सावकारी नियमनाचा कठोर कायदा असला तरी आजही गरजू सर्वसामान्य, शेतकऱ्यांना परवानाधारक किंवा विनापरवाना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. याचे कारण बँकांकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते.                             तातडीच्या गरजा आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पैसा सुलभपणे मिळत नाही. तसेच कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकांकडून नवीन कर्जासाठी नकार देण्यात येतो. त्यामुळे सावकार हा एकमेव पर्याय उरतो. अनेकदा शेतकऱ्यांना बँकांच्या विविध कर्ज योजनांची माहितीच नसते. या कारणामुळे शेतकऱ्यांना अनेकदा सावकारांच्या जाळ्यात अडकावे लागते. ज्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होते. कायद्याने दंडाची तरतूद कर्जदाराची कोणतीही स्थावर मालमत्ता कर्जापोटी स्वतःच्या नावावर करून घेता येत नाही. कर्ज वसुलीसाठी दमदाटी, मारहाण करता येत नाही. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि कर्जदारांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा निबंधक व इतर प्राधिकृत अधिकाऱ्यांची ने...

कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक

इमेज
*कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक**  कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक वेगवेगळ्या मार्गांनी केली जाते. फसवणूक करणारे लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक युक्त्या वापरतात. फसवणुकीचे काही सामान्य प्रकार आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत:  *आमिष:*   स्कॅमर्स कमी व्याजदरात, कमी कागदपत्रांमध्ये किंवा कोणत्याही क्रेडिट तपासणीशिवाय त्वरित कर्ज मंजूर करण्याची हमी देतात.  कर्ज मंजूर झाल्याचे किंवा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून, कर्ज वितरीत करण्यापूर्वी "प्रोसेसिंग फी म्हणून काही रक्कम त्वरित भरण्यास सांगतात. हे पैसे भरल्यानंतर, ते एकतर गायब होतात किंवा आणखी काही भूल थापा देतात आणि कर्ज कधीच देत नाहीत.  *लक्षात ठेवा:*   कोणतीही प्रतिष्ठित बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी अशी मोठी रक्कम थेट तुमच्याकडून खात्यात जमा करून घेत नाही.  *सामान्यतः*  प्रोसेसिंग फी किंवा इतर फी कर्जाच्या रकमेतून वजा केली जाते. फसवणूक करणारे कर्जाची रक्कम मंजूर झाल्याची खोटे धनादेश किंवा ...

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

इमेज
डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन                             ब्राह्मणी येथील दोन दिवसीय शिबिरात 2 नोव्हेंबर 2025 व 3 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या ज्येष्ठ नागरिक सहाय्यक साधने मोफत वाटप शिबिरात  721 ज्येष्ठ नागरिक लाभार्थी तपासणी होऊन पात्र झालेले आहेत या सर्व लाभार्थ्यांना मिळणाऱ्या एकूण सहाय्यक साधनांची किंमत 67 लाख 13 हजार 238 रुपये इतकी आहे सर्व लाभार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.   या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सुजय दादा विखे पाटील व सन्माननीय अक्षय दादा कर्डिले, यांच्या उपस्थितीत लवकरच या सहायक साधनांचा प्रत्यक्ष वाटप समारंभ आयोजित केला जाईल.    याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण नाना बानकर, जिल्हा परिषद माजी सदस्य विक्रम राव तांबे, सरपंच सौ सुवर्णाताई बानकर, उपसरपंच महेंद्र तांबे, विजय वानकर, भाजपा तालुका...

मुंबई येथे बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ...*

इमेज
*मुंबई येथे बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ...*  मुंबई (प्रतिनिधी)  -  गणेश तळेकर  राज्यातील बालकलावंतांसह दिव्यांग बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ रविवारी ( दि.५ - १० -  २०२५ ) रोजी श्री सत्यनारायण महापुजेने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात झालेल्या या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. महापुजेनंतर अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्यासह मध्यवर्ती कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह आसेफ शेख अन्सारी, दिपाली शेळके, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, नागसेन पेंढारकर, वैदेही चवरे सोईतकर, निमंत्रित कार्यकारिणी सदस्य शिवाजी शिंदे, सुजय भालेराव, सीमा यलगुलवार, नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष शुभम चौगुले यांच्यासह बृहन्मुंबई शाखा उपाध्यक्ष  सुनील सागवेकर, कार्याधक्ष्य ज्योती निसळ, प्रमुख कार्यवाहक आसेफ शेख, को...

पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता.

इमेज
पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता.   महाराष्ट्र: भारतीय हवामान विभागाने 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांत जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराचा धोका असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने स्पष्ट केले आहे. या भागांतील नागरिकांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनांना संपूर्ण तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका तर नद्यांच्या पाणीपातळीमुळे फ्लॅश फ्लड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत ठेवण्याचे आदेश. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तयार ठेवणे. जुन्या व धोकादायक इमारतींसाठी सुरक्षा उपाय. ...

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य

इमेज
विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर, 7 सप्टेंबर 2025 रोजी विश्व हिंदू परिषद, लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी गणेश विसर्जनादरम्यान सेवा उपक्रमात सहभाग घेतला. त्यांनी घेसर, निळजे आणि गणेश विसर्जन घाटांवर स्थानिक नागरिक आणि इतर सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांसाठी सेवा कार्य केले. बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी सर्व भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, फुलं आणि सजावट साहित्य गोळा करण्यासाठी मोठ्या निळ्या डस्टबिन बॅगचा वापर केला आणि सर्वांना नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. या गणेशोत्सवादरम्यान, विश्व हिंदू परिषद, लोढा पालावा प्रखंडने "नद्या वाचवा" (Save Rivers) अभियानही चालवले, ज्यात लोकांना पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्तींचे विसर्जन नद्यांमध्ये न करण्याचे आवाहन करण्यात आले. बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी इतर सामाजिक कल्याणकारी संस्थांनाही सहकार्य केले. या उपक्रमादरम्यान बजरंगदल प्रचारक श्री विक्कीजी काळे,...

शेकडो भगिनींची माजी आमदार नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी

इमेज
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही जपली 'सामाजिक रक्षाबंधना' ची संवेदना शेकडो भगिनींची नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी 9 कल्याण : *प्रतिनिधी कल्याणी आगटे*   रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याची महती अधोरेखित करणारा आपल्या संस्कृतीतील एक प्रमूख सण.आजच्या या पवित्र सणाचे औचित्य साधत कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही आपली सामूहिक रक्षाबंधनाची संवेदना जपल्याचे दिसून आले.  पवार यांना राखी बांधण्यासाठी कल्याण पश्चिमेतील शेकडो महिला भगिनींनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.  गेल्या कित्येक वर्षांपासून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा सामाजिक आणि सामुदायिक रक्षाबंधनाचा उपक्रम साजरा केला जात आहे. त्यामध्ये आता केवळ फरक इतकाच आहे की यापूर्वी तो मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन साजरा केला जायचा. आणि यंदा हा सोहळा पवार यांच्या निवासस्थानी साजरा झाला. मात्र त्यानंतरही त्याची व्याप्ती यत्किंचितही कमी झाली नाही. कल्य...

वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा  उल्हासनगर (अशोक शिरसाट) उल्हासनगर - ४ मध्ये सुभाष टेकडी येथे  सारंग थोरात यांनी प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून आपला वाढदिवस केला साजरा तसेच वाढदिवसा निमित्ताने सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आल्या  वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी बोलताना सांगितले सारंग थोरात साहेब यांचे सामाजिक कार्य महान आहे असे चव्हाण वाढदिवसानिमित्त मागदर्शन करीत होते तसेच वंचितचे सारंग थोरात यांना पुढील वाटचालीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या असून या कार्यक्रमात  वंचित चे शेषराव वाघमारे,  रेखाताई उबाळे, उज्वल महाले , दिवाकर खळे, देवानंद ( प्रकाश) शिरसाट, महेंद्र अहिरे,प्रा सुरेश सोनवणे सर, प्रकाश इंगळे, प्रशांत सोनवणे, नितिन  भालेराव, निलेश  देवडे, दिपक आढाव, भारत थोरात, यांच्यासह भारतीय बौध्द महास...

प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित

इमेज
प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित.                        सोलापूर : पाटखळ (ता. मंगळवेढा) येथील निशांत सावतचे (वय २०) घराशेजारील चुलत वहिनी किरण सावतसोबत (वय २३) प्रेमसंबंध जुळले. बारावीपर्यंत शिकलेला निशांत कराड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये कामाला होता.           २० दिवसांपूवी तो किरणला कायमचेच घेऊन जायचे म्हणून गावी आला होता. त्या दोघांनी 'सापही मेला पाहिजे आणि काठीही तुटली नाही पाहिजे' असा तगडा प्लॅन आखला होता. निशांतने पंढरपूर हद्दीतून एक अनोळखी मनोरुग्ण महिलेला हेरून गावीही आणले होते. किरणच्या आई-वडिलांनी तिचा विवाह धुमधडाक्यात लावला होता. किरणला छोटी मुलगी आहे. पती तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा, पण निशांतने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. काही महिन्यांनंतर त्यांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा डाव आखला. त्यासाठी निशांतने मनोरुग्ण महिलेला आणून गळा आवळला आणि तिचा मृतदेह घराजवळील कडब्याच्या गंजी...

गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक.

इमेज
गोकर्णचं किर्र जंगल, खतरनाक विषारी सापं, जीव कसा वाचवला?  गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक.   उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या गोकर्णमध्ये रामतीर्थ नावाचा डोंगर आहे, या भागामध्ये किर्र जंगल आहे, हा प्रदेश चारही बाजुनं विशाल आणि उंच झाडानं वेढलेला आहे. घनदाट जंगलामुळे या भागात सहसा कोणाचाही वावर नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे या जंगलामध्ये माणसांचा फारसा वावर नसल्यामुळे अनेक हिंस्त्र आणि खतरनाक प्राण्यांचं हे जंगल अश्रयस्थान आहे. या जंगलामध्ये तब्बल वीस पेक्षा अधिक खतरनाक विषारी प्रजातीचे साप आढळून येतात.  थोडक्यात काय तर या जंगलामध्ये जाण्याची कोणीही हिंमत करत नाही, आणि गेलाच तर जिंवत परत येईल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. हा रामतीर्थ नावाचा जो डोंगर आहे, तीथे काही गुफा आहेत. त्यातील एका गुफेमध्ये एक रशियन महिला गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या दोन मुलींसोबत राहात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या भागांमध्ये वारंवार भूस्खलनाच्या घटना घडतात, असंच एक दिवस भूस्खलन झालं, मातीच्या ढिगाऱ्याखाली कोणी दबलं तर नाही ना? याच...

५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात ?

इमेज
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात ?                           आजच्या युगात, बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. हे लक्षात घेऊन, सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे.        हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल? सरकारच्या या आरोग्य विमा योजनेत ७० वर्षे आणि त्यावरील सर्व लोकांचा समावेश आहे, त्यांचे उत्पन्न कमी असो वा जास्त. याशिवाय, ज्या लोकांना इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. करदाते, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत लोक, पीएफ किंवा ईएसआयसीची सुविधा मिळवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तुम्ही या पद्धतीने देखील तपासू शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी, त्याच्या...

लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे.

इमेज
लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे. मुंबईतील प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये लागणार 'हा' एक्स्ट्रा डब्बा; तयारीही झाली, 'या' प्रवाशांना सर्वाधिक फायदा.           मध्य रेल्वेने एका नव्या बदलासंदर्भातील निर्णय घेतला असून त्याबद्दलचे रचनात्मक बदलही करण्यात आले आहेत. या निर्णायचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहेत.           रेल्वेने प्रवास आरामदायी होण्यासाठी लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने माटुंगा कारखान्यात लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे. नेमका काय आहे हा सारा प्रकार मध्य रेल्वेवरील प्रत्येक लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. लोकलमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी असे डब्याचे प्रकार आहेत. तर, महिला, दिव्यांग आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र डबे आहेत. गरोदर स्त्रियांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या डब्यात काही आसने राखीव आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीतून प्रवास करणे कठीण होते....

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक

इमेज
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40पर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असेल. तसेच हार्बर लाईनवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05पर्यंत ब्लॉक राहणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.03पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद लोकल ठाणे व कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

इमेज
फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले  पनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.२८) सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले असून, त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील भावनिक चिठ्ठीने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे.   आपल्या बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या चिठ्ठीतून पालकांनी म्हटले आहे. नेमके काय घडले? शनिवारी सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, त्यांना बास्केटमध्ये एक नवजात बाळ दिसले. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. चिठ्ठीतील भावनिक मजकूर समोर बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळाले ...

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला

इमेज
*जेरुसलेम/तेहरान : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला.*.    यानंतर शनिवारी पहाटे इराण आणि इस्रायलने एकमेकांवर पुन्हा हवाई हल्ले केले. इराणने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. आज पहाटे इस्रायलची दोन मोठी शहरे तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले, त्यामुळे रहिवाशांनी आश्रयस्थानांकडे धाव घेतली. लष्कराने सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत असून इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या तासाभरात इराणमधून इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी काहींना रोखण्यात यश आले आहे, असे लष्कराने सांगितले. इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. दोन क्षेपणास्त्रे तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आदळली. या विमानतळावर लढाऊ विमाने आणि वाहतूक विमानांचा तळ आहे. स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याचे इर...