कल्याण ते चवदार तळे महाड व्हाया गांधार पाले लेणी ते कल्याण : बस प्रवासात रंगले अनोखे चालते फिरते साहित्य संमेलन
* चवदार तळे ते गांधारपाली लेणी:* बसप्रवासात रंगले अनोखे ‘चालते-फिरते साहित्य संमेलन’ चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त महाड येथे ‘पेटले महाडचे पाणी’ कविता संग्रहाचे मुखपृष्ठ अनावरण *कल्याण (प्रतिनिधी आशा रणखांबे):* चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीचे औचित्य साधत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘सार्थक साहित्य प्रकाशन’ आणि ‘चवदार तळे सत्याग्रह शताब्दी समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळावेगळा साहित्यिक उपक्रम नुकताच पार पडला. नवनाथ रणखांबे (कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ‘चवदार तळे आणि गांधारपाली लेणी बसमधील चालते-फिरते साहित्य संमेलना’ने उपस्थितांचे लक्ष वेधले. कल्याण ते महाड आणि महाड ते गांधारपाली लेणी असा बसप्रवास करत असताना साहित्य, कविता, वैचारिक मंथन, गझल आणि धम्मसहलीचा सुंदर संगम या निमित्ताने अनुभवयास मिळाला. या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन साहित्यिक भीमराव रायभोळे (अंबरनाथ) आणि कवी तथा पाचपीर ट्रस्टचे संचालक शाम बैसाने (पवई, मुंबई) यांच्या हस्ते झाले. बसप्रवासालाच एका साहित्यिक विचारपीठाचे स्वरूप प्राप्त क...