विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांना महापुरूषांचे योगदान समजावणे गरजेचे
विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांना महापुरूषांचे योगदान समजावणे गरजेचे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांचा सकल्प अंबरनाथ: समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये निसर्गाने विशिष्ट कौशल्य जन्मजात दिलेले आहेत परंतु त्याचा पुरेपुर उपयोग शिक्षणामुळेच होऊ शकतो याची जाणीव ठेऊन शिक्षणासाठी पुढाकार घेणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी अंबरनाथ शहरातील आंबेवाडी या आदिवासी वस्तीवर भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली, समाजासाठी आपले योगदान देणारे तसेच समाजात शिक्षणाची क्रांती घडवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी माहिती विचारताच विद्यार्थ्यांकडुन नकारार्थी मान हलवताच उपस्थिंताचे ह्रदय हेलावून गेले, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना तळागाळातील लोकांपर्यंत त्याग व बलिदान देणारे समाजसेवक यांचे योगदान बिंबवण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत अशी खंत सुन्दर डांगे यांनी व्यक्त केली भटके विमुक्त सामाजिक संस्था महापुरूषांच्या योगदानाबद्दल शाळास्तरावर व सामाजिक कार्यातून जनजागृती करेल असे आश्वासन भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सु