नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कार्यकर्ते गणेश तळेकर यांना ‘विशेष गुणगौरव पुरस्कार – २०२६’ जाहीर!२५ वर्षांच्या अविरत कलासेवेची आणि सामाजिक कार्याची दखल; जनहित न्यूज महाराष्ट्रतर्फे होणार गौरव!

 नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कार्यकर्ते गणेश तळेकर यांना ‘विशेष गुणगौरव पुरस्कार – २०२६’ जाहीर!

२५ वर्षांच्या अविरत कलासेवेची आणि सामाजिक कार्याची दखल;

 जनहित न्यूज महाराष्ट्रतर्फे होणार गौरव!
मुंबई : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या २५ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, कार्यकारी निर्माते, समाजसेवक आणि पत्रकार गणेश तळेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘विशेष गुणगौरव पुरस्कार – २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. जनहित न्यूज महाराष्ट्र आणि बातमी जनहित वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
गणेश तळेकर हे केवळ नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व नसून, नवोदित कलाकारांपासून ते ज्येष्ठ आणि वृद्ध कलावंतांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन चालणारे एक संवेदनशील आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
गेल्या अडीच दशकांपासून त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आपले योगदान दिले आहे. कलाकारांना काम मिळावे, त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि अडचणीत असलेल्या कलाकारांना आधार मिळावा, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ कलाकारांपर्यंत प्रत्येकाला कलाक्षेत्रात संधी मिळावी, ही त्यांची नेहमीच भूमिका राहिली आहे.
नाट्य महोत्सव असो, चित्रपट महोत्सव असो, सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम असोत, प्रत्येक ठिकाणी सहकार्याची भूमिका घेत ते सक्रिय सहभाग नोंदवत असतात. केवळ प्रसिद्धी किंवा स्वतःच्या कामापुरते मर्यादित न राहता इतर कलाकारांनाही पुढे आणण्यासाठी ते सातत्याने धडपड करतात.
समाजसेवेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवणे, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, अशा विविध क्षेत्रांतही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
कलाकारांच्या समस्या, त्यांच्या रोजगाराचे प्रश्न, सांस्कृतिक क्षेत्रातील अडचणी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी ते सातत्याने आवाज उठवत असतात. कला, कलाकार आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे, यासाठी त्यांची धडपड सुरू असते.
त्यांच्या याच प्रदीर्घ कलाप्रवासाची, सामाजिक बांधिलकीची, कलाकारांप्रती असलेल्या आपुलकीची आणि निःस्वार्थ कार्याची दखल घेत जनहित न्यूज महाराष्ट्रतर्फे त्यांना हा मानाचा ‘विशेष गुणगौरव पुरस्कार – २०२६’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
एखादा पुरस्कार हा केवळ व्यक्तीच्या कार्याचा सन्मान नसतो, तर त्याने आयुष्यभर जपलेल्या ध्येयाचा, संघर्षाचा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव असतो. गणेश तळेकर यांना जाहीर झालेला हा पुरस्कार त्यांच्या २५ वर्षांच्या अविरत प्रवासाला मिळालेली कौतुकाची थाप आहे.
त्यांच्या पुढील कलाप्रवासाला आणि सामाजिक कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
— हरी चंदर आल्हाट
मुख्य संपादक / संचालक
जनहित न्यूज महाराष्ट्र | बातमी जनहित

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप