स्पर्धा परीक्षेतील अपयशाने दिली पत्रकारितेची दिशा; पत्नीला प्रेरणा देत तिची पोलीस दलात निवड

स्पर्धा परीक्षेतील अपयशाने दिली पत्रकारितेची दिशा; पत्नीला प्रेरणा देत तिची पोलीस दलात निवड

उल्हासनगर / प्रतिनिधी : स्वप्नं प्रत्येकजण पाहतो; मात्र त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी प्रत्येकाचीच असेल असे नाही. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून समाजासाठी काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मच्छिंद्र विक्रम मोरे यांनी तयारी सुरू केली. अभ्यासादरम्यान महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांच्या विचारांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यातून समाजकार्याची प्रेरणा मिळाली.

स्पर्धा परीक्षेची मनापासून तयारी करूनही अपेक्षित यश हाती आले नाही. काही काळ मनात निराशा दाटून आली; मात्र अपयशाला शेवट न मानता मच्छिंद्र मोरे यांनी समाजाशी नाते टिकवून ठेवले. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना समाजातील विविध प्रश्न आणि अडचणी त्यांना जवळून पाहायला मिळाल्या. सामान्य माणसाचा आवाज प्रशासनापर्यंत व शासनापर्यंत पोहोचविण्यात पत्रकाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांना प्रकर्षाने जाणवले.

याच जाणिवेतून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मास कम्युनिकेशनचा डिप्लोमा पूर्ण केला. शिक्षण घेत असतानाच ‘जनहित न्यूज महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीने त्यांना प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. पत्रकारितेतील त्यांच्या या प्रवासाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात सामाजिक, राजकीय तसेच नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक बातम्या देत त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांच्यासाठी पत्रकारिता हा केवळ व्यवसाय

नसून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे प्रभावी माध्यम ठरले आहे.

या संपूर्ण प्रवासात पत्नी पूनम मोरे यांची साथ तितकीच मोलाची ठरली. स्वतः स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातून गेल्याने मच्छिंद्र मोरे यांनी तिच्याशी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व अनेकदा संवाद साधला. योग्य ध्येय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर कठीण परिस्थितीतही यश संपादन करता येते, हा विश्वास त्यांनी तिच्यात निर्माण केला. त्यांच्या प्रेरणेतून पूनम मोरे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि मेहनत, चिकाटी व सातत्याच्या बळावर त्यांची ठाणे शहर पोलीस दलात निवड झाली.

ज्या स्पर्धा परीक्षेत स्वतःला यश मिळाले नाही, त्याच क्षेत्रात पत्नीने यश संपादन केल्याचा आणि तिच्या यशात आपल्या संघर्षाचाही छोटासा वाटा असल्याचा मनस्वी आनंद मच्छिंद्र मोरे यांनी व्यक्त केला. अपयश म्हणजे स्वप्नांचा शेवट नसून ते आपल्याला खऱ्या ध्येयाकडे नेणारे वळण असते, असा अनुभव या प्रवासातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेतील एक वर्षाच्या वाटचालीनंतरही सामान्य माणसाचा आवाज बनून प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मच्छिंद्र विक्रम मोरे यांच्या या सामाजिक व पत्रकारितेतील कार्याची दखल घेत ‘जनहित न्यूज महाराष्ट्र’च्या वर्धापन दिनानिमित्त संपादक हरी चंदर आल्हाट यांच्या हस्ते त्यांना गुणगौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप