पोपेरे यांना 'विशेष गुण गौरव पुरस्कार' जाहीर;*

 व्ही.पोपेरे यांना 'विशेष गुण गौरव पुरस्कार' जाहीर;*
 सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव!
उल्हासनगर :
समाजात निस्वार्थ भावनेने आणि सातत्याने उत्तम कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची दखल घेत, 'जनहित न्यूज महाराष्ट्र व बातमी जनहित वृत्तपत्र' यांच्या वतीने डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना प्रतिष्ठेच्या 'विशेष गुण गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

डॉ. पोपेरे यांच्या सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ सेवेचे व योगदानाचे वर्णन करताना एका काव्यपंक्तीत म्हटले आहेच
समाजात तेवतात ज्ञानाच्या वाती, निस्वार्थ सेवा त्यांची निरंतर चाली,
विशेष गुण गौरव पुरस्कार' मिळाला आज, डॉ. पोपेरे यांच्या कार्याचा झाला सार्थ अभिमान भारी!
त्यांच्या या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल 'नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य' तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस व उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप