*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा वाढदिवस साधेपणाने ;* आठवडाभर विविध सामाजिक व मानवतावादी उपक्रमांची रेलचेल

*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा वाढदिवस साधेपणाने ;* आठवडाभर विविध सामाजिक व मानवतावादी उपक्रमांची रेलचेल
लातूर:
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून, समाजभानाची जपणूक करत डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनी आपला ६३ वा वाढदिवस कोणताही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण लातूर जिल्ह्यात विविध सामाजिक, वैद्यकीय आणि मानवतावादी उपक्रमांचा 'सेवाभावी सप्ताह' राबवण्यात आला
 आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात
या सेवाभावी सप्ताहाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय, वृद्धाश्रम तसेच अनाथालयातील मुलांना नवीन कपडे आणि फराळ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवण्यात आले आहे.
लातूर जिल्हा 'मोतीबिंदूमुक्त' करण्याचा संकल्प
सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत आरोग्य सेवेला प्राधान्य देत लातूर जिल्ह्यातील गरजूंसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी, मोफत शस्त्रक्रिया आणि चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे संपूर्ण लातूर जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
६३ व्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण
शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोरगरीब व गरजू रुग्णांच्या त्वरित वैद्यकीय सेवेसाठी एका अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
या मानवतावादी सप्ताहाविषयी आणि आयोजित उपक्रमांविषयी डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचे बंधू तथा माजी खासदार संसदरत्न डॉ. सुनील कुमार गायकवाड, सामाजिक सेवाकुंडचे अध्यक्ष 
 अश्वजीत भैया गायकवाड आणि उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. डॉ अनिल कुमार गायकवाड यांचे कौतुक करावे तेवढे कमीच म्हणूनच नेहमी सदैव गोरगरिबांच्या मदतीला धावणारे व सहकार्य करणारे डॉ अनिल कुमार गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लेखन / वृत्त संकलन:
सोनल किशोर श्रीसुंदर
(महिला आघाडी महाराष्ट्र राज्य संघटक सचिव - बहुजन संग्राम / विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र वृत्तदर्शन मीडिया सर्व्हिसेस)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप