*जनसामान्यांचे आधारस्तंभ आणि MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड
*जनसामान्यांचे आधारस्तंभ आणि MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड*
महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला गती देणारे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव, मा. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड साहेब आज वयाची ६२ वर्षे पूर्ण करून ६३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. सहाय्यक अभियंता (श्रेणी-१) या पदापासून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात करत, प्रशासकीय सेवेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचलेला त्यांचा हा ३५ वर्षांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने वाढदिवस आणि 'सेवाभावी सप्ताह'
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून आणि समाजभानाचे भान राखत, डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी आपला यंदाचा ६३ वा वाढदिवस कोणताही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत, २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण लातूर जिल्ह्यात विविध सामाजिक, वैद्यकीय आणि मानवतावादी उपक्रमांचा 'सेवाभावी सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले आहे.
या सेवाभावी सप्ताहाअंतर्गत राबविण्यात आलेले प्रमुख सामाजिक उपक्रम खालीलप्रमाणे आहेत:
* आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार: लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, अशा पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात य आले आहे.
* अनाथ व वृद्धाश्रम भेट: वृद्धाश्रम तसेच अनाथालयातील मुलांना नवीन कपडे आणि फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे.
* लातूर जिल्हा 'मोतीबिंदूमुक्त' करण्याचा संकल्प: आरोग्यसेवेला प्राधान्य देत लातूर जिल्ह्यातील गरजूंसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी, मोफत शस्त्रक्रिया आणि चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.
* अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण: वाढदिवसाचे औचित्य साधून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी गोरगरीब व गरजू रुग्णांच्या त्वरित वैद्यकीय सेवेसाठी एका अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे.
या मानवतावादी सप्ताहाविषयी डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचे बंधू तथा माजी खासदार डॉ. सुनीलकुमार गायकवाड, सामाजिक सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड आणि उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
> "डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नेहमी सदैव गोरगरिबांच्या मदतीला धावणारे आणि सहकाऱ्यांना आधार देणारे असे हे दिलदार मनाचे राजा, माणसातील देवमाणूस आहेत."
>
मनःपूर्वक शुभेच्छा!
संकटात धावून येणाऱ्या, निस्वार्थीपणे समाजसेवा करणाऱ्या डॉ. अनिलकुमार गायकवाड साहेब यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा! भगवंताच्या व बोधिसत्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना की, आदरणीय साहेबांना उदंड, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो!
शुभेच्छुक:
सचिन गायकवाड (कल्याण)
अध्यक्ष, बहुजन संग्राम, ठाणे जिल्हा
प्रमुख प्रतिनिधी, वृत्तदर्शन मीडिया, ठाणे जिल्हा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद