पोस्ट्स

*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा वाढदिवस साधेपणाने ;* आठवडाभर विविध सामाजिक व मानवतावादी उपक्रमांची रेलचेल

इमेज
*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा वाढदिवस साधेपणाने ;* आठवडाभर विविध सामाजिक व मानवतावादी उपक्रमांची रेलचेल लातूर: महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून, समाजभानाची जपणूक करत डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनी आपला ६३ वा वाढदिवस कोणताही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण लातूर जिल्ह्यात विविध सामाजिक, वैद्यकीय आणि मानवतावादी उपक्रमांचा 'सेवाभावी सप्ताह' राबवण्यात आला  आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात या सेवाभावी सप्ताहाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय, वृद्धाश्रम तसेच अनाथालयातील मुलांना नवीन कपडे आणि फराळ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवण्यात आले आहे. लातूर जिल्हा '...

एक दिलदार राजा अन् माणसातील देवमाणूस:* डॉ. अनिलकुमार गायकवाड साहेब!

इमेज
* एक दिलदार राजा अन् माणसातील देवमाणूस:*  डॉ. अनिलकुमार गायकवाड साहेब! — भीमराव निकम - चिलगावकर (कार्यकारी संपादक, बातमी जनहित वृत्तपत्र | प्रदेशाध्यक्ष, बहुजन संग्राम | संपादक, वृत्तदर्शन मीडिया सर्व्हीसेस) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक (MD) तथा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव मा. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड साहेब आज वयाची ६३ वर्षे पूर्ण करून ६४ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. सहाय्यक अभियंता (श्रेणी-२) या पदापासून ते प्रशासनातील सर्वोच्च शिखरापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे. या शुभप्रसंगी त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि सामाजिक प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!  *३५ वर्षांचे ऋणानुबंध अन् आधारस्तंभ*  गायकवाड साहेब आणि माझी मैत्री ही तब्बल ३० ते ३५ वर्षांपूर्वीची—म्हणजेच ते सहाय्यक अभियंता श्रेणी-२ म्हणून कार्यरत असल्यापासूनची आहे. केवळ एक सनदी अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजाचे जिवाभावाचे, संकट काळातील खंबीर मित्र आणि माझे आधारस्तंभ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. माझ्या कौटुंबिक प्रवा...

कल्याण ते चवदार तळे महाड व्हाया गांधार पाले लेणी ते कल्याण : बस प्रवासात रंगले अनोखे चालते फिरते साहित्य संमेलन

इमेज
* चवदार तळे ते गांधारपाली लेणी:* बसप्रवासात रंगले अनोखे ‘चालते-फिरते साहित्य संमेलन’ चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त महाड येथे ‘पेटले महाडचे पाणी’ कविता संग्रहाचे मुखपृष्ठ अनावरण  *कल्याण (प्रतिनिधी आशा रणखांबे):*  चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीचे औचित्य साधत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘सार्थक साहित्य प्रकाशन’ आणि ‘चवदार तळे सत्याग्रह शताब्दी समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळावेगळा साहित्यिक उपक्रम नुकताच पार पडला. नवनाथ रणखांबे (कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ‘चवदार तळे आणि गांधारपाली लेणी बसमधील चालते-फिरते साहित्य संमेलना’ने उपस्थितांचे लक्ष वेधले. कल्याण ते महाड आणि महाड ते गांधारपाली लेणी असा बसप्रवास करत असताना साहित्य, कविता, वैचारिक मंथन, गझल आणि धम्मसहलीचा सुंदर संगम या निमित्ताने अनुभवयास मिळाला. या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन साहित्यिक भीमराव रायभोळे (अंबरनाथ) आणि कवी तथा पाचपीर ट्रस्टचे संचालक शाम बैसाने (पवई, मुंबई) यांच्या हस्ते झाले. बसप्रवासालाच एका साहित्यिक विचारपीठाचे स्वरूप प्राप्त क...

बळीराजाच्या मदतीसाठी उल्हासनगर (पूर्व) युवासेनेचा पुढाकार: ५० हजारांची मदत सुपूर्द

इमेज
बळीराजाच्या मदतीसाठी उल्हासनगर (पूर्व) युवासेनेचा पुढाकार: ५० हजारांची मदत सुपूर्द उल्हासनगर: महाराष्ट्रातील बळीराजावर ओढवलेल्या दुष्काळाच्या संकटात आधार देण्यासाठी उल्हासनगर (पूर्व) युवासेनेच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेनेचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५०,००० रुपयांचा धनादेश खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला. शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत कठीण प्रसंगात त्यांना धीर देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, उपजिल्हाध्यक्ष युवराज पाटील, उपशहर अध्यक्ष सिद्धांत रमेश चव्हाण, शेखर भीमराव सपकाळे, युवासेना सचिव गौरव भानुशाली, चिटणीस प्रवीण करीरा, उपशहर अध्यक्ष अक्षय मांडुळकर, विभाग अध्यक्ष भावेश शेजुळे, उप...

उल्हासनगरात जागतिक बेघर दिनानिमित्त 'पर्णकुटी बेघर निवारा केंद्र' येथे दानशूर सत्कार सोहळा संपन्न

इमेज
उल्हासनगरात जागतिक बेघर दिनानिमित्त 'पर्णकुटी बेघर निवारा केंद्र' येथे दानशूर सत्कार सोहळा संपन्न  जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर येथील 'पर्णकुटी बेघर निवारा केंद्र' यांच्या वतीने एका विशेष दानशूर सत्कार समारंभाचे शानदार आयोजन करण्यात आले होते.  समाजातील बेघरांना निवारा, अन्न आणि मदतीचा आधार देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा सोहळा १० ऑक्टोबर २०२६ रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील गुरुगोविंद हायस्कूलच्या मागे असलेल्या 'पर्णकुटी बेघर निवारा केंद्र' येथे अतिशय उत्साहात पार पडला. या प्रसंगी निवारा केंद्राला निरंतर सहकार्य व मोलाची मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला सामाजिक, पत्रकारिता, कला आणि शैक्षणिक, आणि सामाजिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती....

उल्हासनगर में ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान के तहत श्रमदानसिमरन सेवा प्रतिष्ठान’ को सम्मान पत्र देकर किया गया सम्मानित

इमेज
उल्हासनगर में ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान के तहत श्रमदान सिमरन सेवा प्रतिष्ठान’ को सम्मान पत्र देकर किया गया सम्मानित उल्हासनगर : स्वच्छता ही सेवा - २०२६' अभियान के अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका द्वारा सामूहिक स्वच्छता, श्रमदान और जनजागरूकता कार्यक्रमों का सफल आयोजन किया गया  इस अभियान के तहत १ अक्टूबर २०२६ को "एक दिन, एक घंटा, एक साथ" की संकल्पना पर आधारित छत्रपति शिवाजी महाराज चौक से शांतिनगर वेलकम गेट तक विशाल स्वच्छता अभियान एवं श्रमदान आयोजित किया गया था उल्हासनगर महानगरपालिका के स्वास्थ्य विभाग द्वारा आयोजित इस स्वच्छता अभियान में सामाजिक संस्था 'सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ के पदाधिकारियों और स्वयंसेवकों ने महानगरपालिका के अधिकारियों व सफाई कर्मचारियों के साथ मिलकर बड़े पैमाने पर सक्रिय योगदान दिया  स्वच्छता, श्रमदान और जनजागरूकता से जुड़े विभिन्न उपक्रमों में लोगों ने उत्साहपूर्वक भाग लिया स्वच्छ, सुंदर और स्वस्थ उल्हासनगर के निर्माण में उत्कृष्ट योगदान के लिए महानगरपालिका परिसर में 'एप्रिसिएशन सेलिब्रेशन' ...

उल्हास नदीच्या पाण्याचा लालसर रंग; कर्जतच्या चिल्हार नदीकाठावरील बेसुमार डोंगर कटिंग आणि मातीचा भराव कारणीभूत?

इमेज
उल्हास नदीच्या पाण्याचा लालसर रंग; कर्जतच्या चिल्हार नदीकाठावरील बेसुमार डोंगर कटिंग आणि मातीचा भराव कारणीभूत ?   उल्हास नदी बचाव कृती समिती आणि पर्यावरणप्रेमींची प्रत्यक्ष पाहणी   अभिनंदन लोधा प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व उत्खनन उघड   वैज्ञानिक तपासणीची आणि संयुक्त पंचनाम्याची मागणी बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून अचानक उल्हास नदीचे पाणी लालसर व गढूळ झाले होते उल्हास नदीच्या गढुळ पाण्याची बातमी सुद्धा प्रसारित झाली होती उल्हास नदीच्या पाण्याचा नेमका स्रोत शोधण्यासाठी उल्हास नदीच्या वरच्या प्रवाहापासून विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान कर्जतजवळील पिंपळोळी परिसरातील चिल्हार नदीकाठावर सुरू असलेले अभिनंदन लोधा कंपनीचे १८० एकर क्षेत्रातील प्लॉटिंग प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणातील डोंगर कटिंग हा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वैज्ञानिक तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उल्हास नदी बचाव कृती समितीने केली आहे. डोंगर कटिंग व भुस्खलनाचा धोका पिंपळोळी परिसरा...