*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा वाढदिवस साधेपणाने ;* आठवडाभर विविध सामाजिक व मानवतावादी उपक्रमांची रेलचेल
*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा वाढदिवस साधेपणाने ;* आठवडाभर विविध सामाजिक व मानवतावादी उपक्रमांची रेलचेल लातूर: महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून, समाजभानाची जपणूक करत डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनी आपला ६३ वा वाढदिवस कोणताही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण लातूर जिल्ह्यात विविध सामाजिक, वैद्यकीय आणि मानवतावादी उपक्रमांचा 'सेवाभावी सप्ताह' राबवण्यात आला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात या सेवाभावी सप्ताहाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय, वृद्धाश्रम तसेच अनाथालयातील मुलांना नवीन कपडे आणि फराळ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवण्यात आले आहे. लातूर जिल्हा '...