कोकण विभाग शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पारडे जड
कोकण विभाग शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पारडे जड
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक संघटना व पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी , युतीकडे व अन्य पक्षाकडे अनेक संघटनांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र या सर्वांमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे पारडे जड असून आगामी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी. तेच दावेदार असल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडी व युतीमुळे शिवसेना, शिंदे गट व भाजपा यांच्यासमोर उमेदवार घोषित करताना पेच निर्माण झालेला आहे, सर्वच पक्षांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी केली असून प्रत्येक पक्ष त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न सुरू करत आहे. आज पर्यंत ज्या ज्या पक्षांनी व संघटनेने उमेदवार जाहीर केले आहे, त्यात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येणारा व जिंकणारा उमेदवार सर्वांना दिसत आहे.
सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सतत निस्वार्थपणे झटणारा, त्यांना न्याय मिळवून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.त्यांच्या कामाची चर्चा महाराष्ट्रभर असून, शिक्षकांची लोकप्रियता असलेला उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रेंकडे पाहिले जाते.
या निवडणुकीत शिक्षक नसलेले अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले आहेत तर काही सेवानिवृत्त झालेले शिक्षकही उत्सुक आहेत. परंतु सर्वांच्या तोंडून एकच नाव आमच्या सर्वेक्षणातून पुढे पुढे येत आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे !
अनेक शिक्षकांची मतं आजमावल्या नंतर त्यांनी सांगितले की विद्यमान आमदारांनी शिक्षकांची काम केलेली नाहीत, त्यांच्या काम न करण्याने उलट शिक्षण विभागात भ्रष्टाचार वाढ झालेला आहे , त्यांना अनेक शिक्षक ओळखत सुद्धा नाहीत, यावेळी कितीही आमिष दाखवले, पाकीट वाटले, शाळांना संगणक ,कंपास पेट्या, सारख्या वस्तू भेटी दिल्या, तरी शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे असे मत सर्वांनी व्यक्त केले आहे.
शिक्षक नसलेल्या उमेदवारांच्या बाबतीत शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे
त्यामुळे यावेळी कोकण विभाग शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पारडे जड असल्याचे पुढे येत आहे
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद