जया प्रदा यांच्या हस्ते पुण्यातील दिमाखदार सोहळ्यात गौरव;
जया प्रदा यांच्या हस्ते पुण्यातील दिमाखदार सोहळ्यात गौरव; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती *(प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट )* पुणे इन्साइट्स सक्सेस मीडिया एलएलसी, इन्साइट्स सक्सेस मीडिया आणि ग्लोबल ह्युमॅनिटेरियन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नॅशनल प्रेस्टिज लीडरशिप अवॉर्ड्स २०२६’ हा भव्य व प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा नुकताच पुणे येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचे आदिवासी सेवक तथा ‘नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन’चे (नागपूर, महाराष्ट्र राज्य) जनरल सेक्रेटरी डी.लिट. डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन लीडरशिप नॅशनल अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार भारताच्या माजी खासदार तथा सुप्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते डॉ. पोपेरे यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथील या सोहळ्यात भारतातील विविध राज्यांतील उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, उद्योजक तसेच ...