पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विक्रम गोखलेंच्या 'सूर लागू दे' चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
विक्रम गोखलेंच्या 'सूर लागू दे' चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला... १२ जानेवारी २०२४ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार 'सूर लागू दे' रंगभूमीपासून मराठी-हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे अभिनेते विक्रम गोखले यांनी मागच्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी कलेच्या माध्यमातून ते अजरामर आहेत. प्रतिकूल परिस्थितीही आपल्या वाट्याला आलेलं काम चोख बजावणं हा अतिशय दुर्मिळ गुण विक्रम गोखले यांच्या ठायी होता. याच बळावर त्यांनी अखेरच्या काळात बऱ्याचदा प्रकृती अस्वस्थ असतानाही आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी मोठ्या जिद्दीनं कॅमेरा फेस केला. विक्रम गोखले यांच्या पश्चात अत्यंत जड अंत:करणारे 'सूर लागू दे' हा त्यांचा अखेरचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मनोरंजन विश्वातून यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक 'किंग' कुमार यांनी 'सूर लागू दे' या चि

नोकरी अन् कर्जाचे आमिष, ३५७ कोटींचे रॅकेट उद्ध्वस्त; सीबीआयची देशभरात कारवाई

इमेज
 मुंबई :  तरुणांना नोकरीचे आमिष दाखवणे, सुलभ कर्जाचे गाजर दाखवणे, भरघोस परतावा योजना सादर करत फसवणे, अशा विविध कारणांद्वारे तब्बल ३५७ कोटींचे रॅकेट चालविणाऱ्या भामट्यांचा  सीबीआयने  पर्दाफाश केला. ऑपरेशन चक्र -२ या अंतर्गत यात गुंतलेल्या कंपन्या व लोकांचा वर्षभर मागोवा घेत ही कारवाई केली आहे.  गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवसी  सीबीआयने  देशभरात ७५ पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली. अनेक संगणक, डिजिटल उपकरणे ताब्यात घेतली. सामान्यांना फसविण्यासाठी या सायबर भामट्यांनी सोशल मीडियाद्वारे जाहिराती देत लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले. १३७ बनावट कंपन्यांद्वारे परदेशात फिरवला पैसा लोकांना गंडा घालून मिळवलेला हा पैसा फिरवण्यासाठी तब्बल १३७ बनावट कंपन्या स्थापन  केल्या. या कंपन्यांद्वारे यूपीआय आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून परदेशात पैसा फिरवला. पुढे या पैशांची गुंतवणूक क्रिप्टो करन्सीमध्ये केल्याचेही सीबीआयच्या तपासात आढळले आहे. सुमारे १६ बँक खात्यातून ३५७ कोटींचे व्यवहार झाल्याचे आढळले आहे. जप्ती कशाची?  कारवाईदरम्यान एकूण ३२ मोबाईल, ४८ लॅपटॉप, दोन सर्व्हर, ३३ सीमकार्ड, शेकड

जुन्या पेन्शनचा मुद्दा तापणार

इमेज
 जुन्या पेन्शनचा मुद्दा तापणार  राज्यभरात होणार्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सरकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, सरकारी विभागातील कंत्राटीकरण थांबवावे, सरकारी कार्यालयांतील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात आदी 18 प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी व शिक्षकांनी मार्च महिन्यात आठ दिवस बेमुदत संप केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे आर्थिक लाभ व सामाजिक सुरक्षितता दिली जाईल असे लिखित आश्वासन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले होते. सहा महिने उलटून गेले तरी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याने राज्यभरातील सरकारी कर्मचाऱयांत सत्ताधाऱयांविरोधात असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी संघटनांची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी 8 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, तहस

३२ हजार शिक्षक भरतीचं वेळापत्रक फायनल; २४ जिल्ह्यांची बिंदुनामावली अंतिम

इमेज
३२ हजार शिक्षक भरतीचं वेळापत्रक फायनल; २४ जिल्ह्यांची बिंदुनामावली अंतिम.          खासगी संस्थांना मुलाखतीचे बंधन खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची पदे भरताना एका पदासाठी तीन उमेदवारांना राज्य स्तरावरूनच मुलाखतीसाठी त्या संस्थेत पाठविले जाणार आहे. त्या तिघांमधून एकाची मुलाखतीद्वारे निवड करायची आहे.                      दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भरतीसाठी उमेदवारांना कितीही जिल्हे तथा शाळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.सोलापूर : राज्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरतीला आता प्रारंभ झाला आहे. जानेवारीअखेर ३२ हजार पदांची भरती होणार आहे. आता संस्था व जिल्हा परिषद शाळांना रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तीन आठवड्यांची (७ नोव्हेंबरपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारांकडून प्रत्येक प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. जिल्हा परिषदांच्या जवळपास ६३ हजार शाळांमध्ये ३० हजारांवर शिक्षक तर खासगी संस्थांमध्येही १५ हजारांवर शिक्षक कमी आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नसतानाही तब्बल साडेसहा

बालविकास प्रकल्प (नागरी)उल्हानगरबीट ०५ सी ब्लॉक ग्रुप तर्फे रंग नवरात्रीचा रंग पोषणाचा

इमेज
बालविकास प्रकल्प (नागरी) उल्हानगर बीट ०५ सी ब्लॉक ग्रुप तर्फे  रंग नवरात्रीचा रंग पोषणाचा  उल्हासनर: जागर फळांचा जागर भाज्यांच्या जागर आहाराचा हिरव्या भाज्या मध्ये व्हिटॅमिन  ए,सी, इ, मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे रोजच्या जेवणात एक तरी पालेभाजी,हिरवी कोणतीही भाजी असावी .आहारातील हिरव्या भाज्यांना खूप महत्व  पालकांना पटवून दिले अंगणवाडी कर्मचारी उमा डोळस,सीमा जोशी,आशा येवले,छाया तिडके,ज्योती चव्हाण,राजेश्री खैरे,प्रमिला महिरे,अंकिता चौधरी,मथुरा कांबळे,रंजना सिरसाठ,नूतन मोटघरे,नंदा पालवे, कमल कदम,दोंदेताई, सुवर्णा अडसुळे,सेविका मदतनीस उपस्थित होते

नवरात्री च्या दिवसांत शेकडो नवदुर्गा आक्रमक

इमेज
नवरात्री च्या दिवसांत शेकडो नवदुर्गा आक्रमक.. उल्हासनगर उपविभागीय अधिकारी  उल्हासनगर प्रांत कार्यालय, व आयुक्त व प्रशासक, उल्हासनगर महानगर पालिका यांना शेकडो महिलानी हस्ताक्षर करुन निवेदन दिले जाईल कि समाजमंदिर बांधून मिळावे, ह्यासाठी सतत 10 वर्षांपासुन मागणी करुन सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही म्हणुन प्रशासनाचे ध्यानाकर्षण करणेसाठी 20 ऑक्टोबर रोजी सह्यांची मोहिम राबवण्यात आली, रमाबाई आंबेडकर नगर च्या बाजुला, दत्त मंदिर च्या पुढे, राम डेकोरेटर च्या मागे, भाऊराव तबेला च्या बाजुला, चोपडा कोर्ट उल्हासनगर 3 येथील खाली असलेल्या शासकीय जागेवर समाजमंदिर बांधून मिळावे ह्याकामी गेल्या 10 वर्षांपासुन स्थानिक नागरिक व महिला पुर्व आमदार ज्योती कालानी व पुर्व महापौर पंचम कालानी यांचेद्वारे पत्रव्यवहार करुन उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनास सतत मागणी करीत आहेत, सदर रिकाम्या असलेल्या जागेच्या आसपास 1500 ते 2000 लोकवस्ती आहे, व त्या जागी आसपास एक ही समाजमंदिर नसल्याने ही मागणी केली जात आहे, धार्मिक कार्य, आंगणवाडी, छोट्या मुलांसाठी चे उपक्रम ह्यासाठी सदर समाजमंदिर त्या ठिकाणच्या

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना “भाऊबीज भेट” वितरित करण्यात येणार

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना “भाऊबीज भेट” वितरित करण्यात येणार बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हेच लक्षात शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना “भाऊबीज भेट” वितरित करण्यात येणार आहे. भाऊबीज भ

बाल विकास प्रकल्पाचे वतीने नवरात्रीचे औचित्य साधून नऊ रंगांवर आधारित पाककृती व इतर उपक्रमांचे आयोजन

इमेज
बाल विकास प्रकल्पाचे वतीने नवरात्रीचे औचित्य साधून नऊ रंगांवर आधारित पाककृती व इतर उपक्रमांचे आयोजन  उल्हासनगर:बाल विकास प्रकल्प  व इतर उपक्रमांचे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी फडोळ, तसेच सर्व मुख्य सेविका मॅडम यांच्या आदेशाने   दिनांक १७ आॕक्टोबर २०२३ ते दिनांक २३ आॕक्टोबर २०२३ या कालावधीत नवरात्रीचे औचित्य साधून प्रकल्प कार्यक्षेत्रात नऊ रंगांवर आधारित पाककृती व इतर उपक्रमांचे आयोजन अंगणवाडी क्रमांक १४६ मध्ये करण्यात आले    या प्रसंगी विजया कुंभार, शोभा चौगुले, सुषमा केणी, श्रृतिका मोहिते, तसेच                                              विजया कुंभार, शोभा चौगुले, सुषमा केणी, श्रृतिका मोहिते, मीना फर्डे, द्वारका चीम,सरस्वती पाटील, पंचशीला देशमाने,कविता जाधव,वैशाली शेट्टी,विशाखा मोने,स्वाती पाटील, शारदा पाटील,मीना  मराठे,सितल मराठे ,प्रीती,गुडडला ,शीतल मराठे, मीना मोरे, शारदा मानमोडे, रत्ना पवार, ज्योती मानमोडे,संगीता खैरनार,पद्मिनी अडकित्ते तसेच अनेक सेविका मदतनीस उपस्थित होत्या ब्यूरो रिपोर्ट जनहि

क्रांती महिला मंडळ आणि शिव रुद्रा संघ यांच्या वतीने नवदुर्गा नवरात्र उत्सव

इमेज
क्रांती महिला मंडळ आणि शिव रुद्रा संघ यांच्या वतीने नवदुर्गा नवरात्र उत्सव उल्हासनगर: होली फ़ैमिली स्कूल रोड लालचक्की उल्हासनगर कॅम्प नंबर 4 या ठिकाणी गरबा रास व दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  या वेळी महिला, पुरुष, तसेच लहान बालके व अनेक भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमात आनंद उत्सव साजरा केला.  क्रांती महिला मंडळ आणि शिव रुद्रा संघ यांच्या वतीने नवदुर्गा नवरात्र उत्सवाचे दुसरे वर्ष साजरे करण्यात आले या वेळी सौ लता पगारे, रामजीत गुप्ता, सुरेखा विजय जळकोटे, अभिषेक मदास, कोमल तायडे, सोहम भंगाळे, मीनाक्षी बटावे, सुनीता माळी, स्वप्नील पगारे, कल्पना दिपेश, शुभम जाधव, सुजाता नगरकर, राजकुमारी गुप्ता, प्नीतू वारके,  तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमात सहभागी असलेल्या भाविकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  गरबा दांडिया मध्ये सहभागी असलेल्या भाविकांना एकूण ३ सन्मान चिन्ह देन्यात आली   २१-१०-२३ रोज़ी फॅन्सी ड्रेस ठेवन्यात आला आहें

उल्हासनगर महानगरपालिकेच्या निधीतून महर्षी वाल्मिक महाराज मंदिराचे भूमिपूजन

इमेज
 उल्हासनगर महानगरपालिकेच्या निधीतून महर्षी वाल्मिक महाराज मंदिराचे भूमिपूजन उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील इमलीपाडा वाल्मिकी नगर या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या निधीतून महर्षी वाल्मिक महाराज मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय वाल्मिक नवयुवक संघ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राधाचरण करौतीया, सन्नी भगवाने, हरिचंद्र करोतिया, बहादुर करोतिया, रॉकी करोतिया, तसेच प्रमुख उपस्थिती, टोनी शिरवानी, बंटी भटीजा, राजेश कजानिया, समाजसेवक हाडाळे, यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई केंद्रातून नाशिक शाखेची ‘अ डील’ एकांकिका सर्वोत्कृष्ट*

इमेज
*अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई केंद्रातून नाशिक शाखेची ‘अ डील’ एकांकिका सर्वोत्कृष्ट* मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १० ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा येथे पार पडली. नाट्य परिषदेच्या सर्व शाखांसाठी हा उपक्रम गेल्या १३ वर्षांपासून सुरू आहे. मागील ४ वर्षांपासून हा उपक्रम बंद करण्यात आला होता. परंतु नवनिर्वाचित कार्यकारी समितीने या स्पर्धा पुन्हा सुरू केल्या आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी प्राथमिक फेऱ्या संपन्न झाल्या आहेत. मुंबई येथील प्राथमिक फेरी उद्घाटन प्रसंगी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ अभिनेत्री व कार्यकारी समिती सदस्या श्रीमती सविता मालपेकर, कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके, सहकार्यवाह श्री. दिलीप कोरके, बालरंगभूमीचे असिफ अन्सारी, परीक्षक श्रीमती रुपाली मोरे, श्री. अनंत जोशी, स्पर्धा प्रमुख श्री. शिवाजी शिंदे, श्री. दिगंबर आगाशे उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ५ एकांकिका सादर झाल्या. बोरिवली शाखेने सुरकु

१२५ विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी महाराष्ट्र राज्य बोर्ड साठी ऑनलाईन आयडियल स्टेडिॲपचे वाटप

इमेज
१२५ विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी महाराष्ट्र राज्य बोर्ड साठी ऑनलाईन आयडियल स्टेडिॲपचे वाटप   डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ पलावा यांच्यावतीने लोढा हेवन, डोंबिवली येथील आदर्श पब्लिक हायस्कूल इंग्लिश स्कूलच्या १२५ विद्यार्थ्यांना इयत्ता १०वी (महाराष्ट्र राज्य बोर्ड) साठी ऑनलाइन आयडियल स्टडी ॲप चे वाटप करून मोलाचे कार्य केले या प्रकल्पासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आरटी लएन शैलेश गुप्ते, यांचे आभार व्यक्त करण्यात आले  आर टी एन वैरावण, आणि लक्ष्मी वैरावण, तसेच तमिळ समाजाचे अध्यक्ष श्री पांडियन, यांनी नेहमी प्रमाणे दिलेल्या पाठिंब्या बद्दल धन्यवाद व्यक्त केली  आर टी एन सोनिया अरोरा, यांच्या प्रयत्नांची प्रशंशा करण्यात आली.१२५ विद्यार्थ्यांना ॲप बद्दल मार्गदर्शन करण्यात आले  आर टी एन  सोनिया यांनी खात्री केली की सर्व १२५ विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केले आहे आणि चाचणी चालवली आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल रोटेरियन्सचे आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी आरटीएन एन सोनिया होटकर,आरटीएन जुगल कोलारिया,आरटीएन शाजी पिल्लई,आरटीएन पृथ्वीराज, आरटीएन एन पूनम पृथ्वीराज, आरटीएन सदानंद पुट्टा,

उल्हासनगर मध्ये लोक कल्याणासाठी सह्यांची मोहीम

इमेज
उल्हासनगर मध्ये लोक कल्याणासाठी सह्यांची मोहीम, पुर्व आमदार पप्पु कालानी व उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयचे मुख्य शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांचे समर्थन उल्हासनगर: मिशन जय भारत अंतर्गत 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिना पासून सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत लोक कल्याणासाठी सह्यांची मोहीम मध्यवर्ती रुग्णालय गेटच्या बाहेर गेल्या 4 दिवसांपासुन राबवण्यात येत आहे. उल्हासनगर 3 येथील सेंट्रल हॉस्पिटल सुधारलाच पाहिजे, मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, कुपोषित बालकांसाठी विशेष केंद्र झालं पाहिजे, अपंगांसाठी विशेष केंद्र झालंच पाहिजे, मनोरुग्णांसाठी विशेष केंद्र झालंच पाहिजे, नर्सिंग कॉलेज झालं पाहिजे, या सगळ्या मागण्या घेऊन आज सह्यांच्या मोहीमचा चौथा दिवस आहे. बौध्द विहार संघटना समन्वय समिती व इंडियन सोशल मुव्हमेंट च्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्यव्यवस्था सुधारणांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आज चौथ्या दिवशी पुर्व आमदार पप्पु कालानी यांनी भेट दिली. त्या प्रसंगी मध्यवर्ती रुग्णालय चे मुख्य शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे उपस्थित राहून हस्ताक्षर अभियानात

मा.खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड योगा थेरपिस्ट परीक्षा उत्तीर्ण

इमेज
मा.खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड योगा थेरपिस्ट परीक्षा उत्तीर्ण लातूर ( विशेष प्रतिनिधी) लातूर चे माजी लोकप्रिय संसदरत्न खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड हे भारत सरकार च्या आयुष मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या “योगा थेरपिस्ट “ च्या अत्यंत अवघड अशा परीक्षेत चांगल्या मार्कांनी उतीर्ण झाले आहेत. भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी योगा ला जगात ओळख दिली. त्यांच्या सोबत १६ व्या लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी केलेले लातूर चे माजी खासदार यांनी योगाच्या सर्व परीक्षा पास झाले आहेत. डॉ सुनील बळीराम गायकवाड हे अनेक विषयात पदवीधर असून १६ व्या लोकसभेत हायली एज्युकेटेड मेंबर ऑफ पार्लियमेंट असे हाई रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डकडे नोंद झालेली आहे. लातूर लोकसभेत अनेक विकास कामे केलेले खासदार अशी लोकप्रियता डॉ सुनिल बळीराम गायकवाड यांची आहे. यापूर्वी ही भारत सरकारच्या आयुष मंत्रालय कडून योगाच्या “योगा इन्स्ट्रक्टर” आणि “योगा टिचर अँड ईवैल्यूयर “ या दोन परीक्षा डॉ गायकवाड चांगल्या मार्कानी पास झाले आहेत.  योगा थेरपिस्ट चे भारत सरकार च्या योगा सर्टिफिकेशन बोर्ड चे प्रमा

मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या “राजभाषा किसे कहते” पुस्तकाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा जी यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

इमेज
मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या “राजभाषा किसे कहते” पुस्तकाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा जी यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न पुणे ( विशेष प्रतिनिधी) आज पुणे येथील श्रीशिव छत्रपती स्पोर्ट्स काम्प्लेक्स,बालेवाडी येथील स्टेडियम मध्ये भारत सरकारच्या गृहमंत्रालया ने आयोजित केलेल्या हिंदी दिवस निमित तिसरे अखिल भारतीय हिंदी संमेलनच्या उद्घाटन सत्रामधे लातूर लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट संसद रत्न,राजभाषा समिती भारत सरकारच्या समितीचे माजी सदस्य,माजी खासदार  प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लिहलेले “राजभाषा किसे कहते है” या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन भारत सरकार चे गृहराज्यमंत्री अजय मिश्रा,राज्यसभेचे उप सभापती हरिवंश जी,केंद्रीय आरोग्यराज्य मंत्री भारती पवार,राजभाषा समिती चे उपाध्यक्ष भर्तहरी महंताब,एमएसएमई चे राज्यमंत्री वर्मा जी, गृहमंत्रालय भारत सरकार च्या सचिव अंशुली आर्या, सह सचिव श्रीमती जॉली, या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लिहलेल्या राजभाषा किसे कहते है ? हे पुस्तक त्यांनी २०१४ ते २०१९ या काळा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे साखळी उपोषण

https://youtu.be/iPAAuSGdKdA?si=DtkKZmFrLKYmrV6V.       अंबरनाथ बुवा पाडा विभागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे दिनांक 6 ऑक्टोंबर 2023 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अंबरनाथ विधानसभा रा कॉ पा चे युवक अध्यक्ष सुरेश उर्फ मनोज शिवानंद सिंह, माजी नगरसेविका सौ श्रुति सुरेश सिंह, तसेच धनंजय सुर्वे, सदा मामा पाटील, विनोद शेलार, नरेंद्र काळे, यांच्या वतीने अनिश्चित कालीन अनशन साखळी उपोषण.                                      जनहित न्यूज महाराष्ट्र. 9960504729