चला पुस्तकांशी दोस्ती करुया " या संकल्पनेवर आधारित भव्य पुस्तक प्रदर्शन

चला पुस्तकांशी दोस्ती करुया " या संकल्पनेवर आधारित भव्य पुस्तक प्रदर्शन 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे  सिधू भवन येथे चला पुस्तकांशी दोस्ती करुया " 
या संकल्पनेवर आधारित भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १मे पासून ३मे रोजी पर्यंत करण्यात आले 

या पुस्तक प्रदर्शनात उल्हासनगर महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये शेक्षणिक अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर उपक्रमात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या एकूण १३० विद्यार्थ्यांचा सत्कार दि.३ मे, २०२४ रोजी करण्यात आला असून, विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या या नैपुण्याला विशेष प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचा, त्यांच्या शिक्षकांचा आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचाही विशेष सत्कार या निमित्ताने करण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिकेचे मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. अजीज शेख यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शालेय स्तरावरील बालवाडीतील विद्यार्थीनीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त केलेल्या महाविद्यालयीन युवकांचे कौतुक मा. आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांनी केले. विद्यार्थ्यांनी उच्च स्तरावर यश संपादन करण्याकरीता कसोशीने प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना शेक्षणधिक अडचणीचे निरसन करणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यंदाचे वर्ष हे निवडणूकीचे वर्ष असल्यामुळे या पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाच्या संदर्भात जनजागृती व्हावी व मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान करावे असे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांनी केले.

सदर कार्यक्रमास मा. आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख, मा.उप-आयुक्त (शिक्षण) डॉ. सुभाष जाधव, मा.प्रशासन अधिकारी दिपक धनगर, श्रीमती निलम कदम, उपलेखाधिकारी (शिक्षण), भांडार व्यवस्थापक अंकुश कदम, सदामंगल पब्लिकेशनचे प्रकाशक संदीप चव्हाण व समग्र शिक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच अनिल पाटील सर 
शाळा क्र २९ चे मराठे सर, 
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती शिरसाट उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार