भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटना मध्ये हरी चंदर आल्हाट यांची महासचिव या पदावर नियुक्ती

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटना मध्ये हरी चंदर आल्हाट यांची ठाणे जिल्हा महासचिव या पदावर नियुक्ती

उल्हासनगर:प्रतिनिधी अशोक शिरसाट
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संस्थापक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब साठे यांच्या वतीने हरि चंदर आल्हाट यांना भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनांमध्ये ठाणे जिल्हा महासचिव या पदावर नियुक्त करण्यात आले हरी आल्हाट मागील अनेक वर्षापासून जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत, कामगारांचे प्रश्न सोडविणे, नागरीसुविधा बाबत लढने, वृध्द, विधवा महिला व लहान बालके यांच्यावर होणारे आन्याय अत्याचार या साठी लढा देणे तसेच अनेक गोरगरीब गरजवंत आणि दिव्यांग यांना गरजेनुसार पत्रकारितेच्या माध्यमातून तसेच एनजीओच्या माध्यमातून जमेल तेवढी मदत करीत आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब साठे यांनी ठाणे जिल्हा महासचिव या पदावर नियुक्तीपत्र देऊन भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनामध्ये सन्मान पूर्वक नियुक्ती पत्र देऊन जनतेच्या न्याय हक्कासाठी तसेच आपल्या देशातील व राज्यातील होत असलेल्या भ्रष्टाचारा विरोधात लढा देण्याकरिता नियुक्त केले आहे एडवोकेट किरण जाधव, पत्रकार अशोक शिरसाट यांच्या हस्ते हरी आल्हाट यांना नियुक्ती पत्र देण्यात आले या वेळी उपस्थित मान्यवरांनी हरी आल्हाट यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप