आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या संशयावरून 'फेअर प्ले'ॲपशी संबंधित मुंबई व पुणे येथील १९ ठिकाणांवर आठ कोटींचा मुद्देमाल जप्त

आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या संशयावरून 'फेअर प्ले'ॲपशी संबंधित मुंबई व पुणे येथील १९ ठिकाणांवर आठ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई - देश-परदेशातील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या संशयावरून 'फेअर प्ले'ॲपशी संबंधित मुंबई व पुणे येथील १९ ठिकाणांवर गुरुवारी (ता. १३) आठ कोटींचा मुद्देमाल जप्त केला

 सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराशी निगडित कागदपत्रे हस्तगत केली. या व्यवहारांसाठी वापर झालेल्या सुमारे ४०० बँक खात्यांचे तपशील मिळाले असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती ईडीने दिली. 

अवैधपणे आयपीएलचे प्रसारण केल्याबद्दल वयकॉम १८ च्या तक्रारीवरून अलीकडेच सायबर महाराष्ट्रने फेअर प्ले ॲपविरोधात गुन्हा नोंदवला होता. या ॲपची जाहिरात केल्याबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीतील काही तारे-तारकांचीही चौकशी सुरू होती. याच गुन्ह्याचा आधार घेत ईडीने प्रकरण नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. ईडी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या ॲपद्वारे क्रिकेट सामन्यांसोबत लोकसभा निवडणुकीवर ऑनलाईन बेटिंग सुरू होते.

ईडी अधिकाऱ्याने पुढे दिलेल्या माहितीनुसार फेअर प्ले ॲपने आपली जाहिरात करण्यासाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांना दुबई आणि अन्य देशांमध्ये करारबद्ध केले; मात्र त्याआधी या ॲपद्वारे सुरू असलेले गैरप्रकार किंवा आर्थिक गैरव्यवहारांची माहिती घेण्याची तसदी या कलाकारांनी घेतली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बोगस खात्यांत रक्कम

फेअर प्ले ॲपने आयपीएल प्रसारण आणि ऑनलाईन बेटिंगच्या माध्यमातून कमावलेली कोट्यवधींची रक्कम शेकडो बोगस कंपन्यांच्या बँक खात्यांवरून गोळा केली आणि गैरव्यवहारात सहभागी असलेल्या काही औषध कंपन्यांमध्ये फिरवली. पुढे हीच रक्कम हाँगकाँग, चीन आणि दुबई येथील बोगस कंपन्यांमध्ये वळती केल्याची माहिती तपासादरम्यान उघड झाल्याचे ईडी अधिकाऱ्याने सांगितले. या व्यवहारांमध्ये सहभागी असलेली सुमारे ४०० बँक खाती समोर आली आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप