पोस्ट्स

उल्हास नदीत दुसऱ्या दिवशी सुद्धा जलपर्णी दर्शन...मोहना बंधारा पाणी उपसा केंद्र येथे मोठ्या प्रमाणात अडकत आहे जलपर्णी

इमेज
उल्हास नदीत दुसऱ्या दिवशी सुद्धा जलपर्णी दर्शन... मोहना बंधारा पाणी उपसा केंद्र येथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकत आहे  दिनांक 24 जून 2022 ठाणे जिल्ह्यातील 50 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी ही मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागली आहे. कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रीत सांडपाणी आणि नदीत वेगाने वाढत असलेली जलपर्णी या दोन्हीमुळे जलचरांचे अस्तित्व संकटात सापडले आहे.  बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरातील गावांचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे उल्हास नदीचे अनेक ठिकाणी नाल्यात रूपांतर झाले आहे. काही वर्षांपासून नदीपात्रात जलपर्णी फोफावत आहे. गेल्या वर्षी केलेल्या उपाययोजना मुळे बऱ्याच प्रमाणात ह्यावर्षी कमी झालेली दिसून येत होती, परंतु आज अचानक रीजेंसी एंटीलिया ते मोहना एनआरसी बंधारे पर्यंत ही अवाढव्य जलपर्णी दिसून आली, उल्हास नदीत दुसऱ्या दिवशी सुद्धा 24 जुन रोजी वाहत येणाऱ्या जलपर्णीचे दर्शन झाले, मोहना बंधारा पाणी उपसा केंद्र येथे मोठ्या प्रमाण...

उल्हासनगर मध्ये पहिल्याच पावसात मुख्य रस्ता झाला जलमय

इमेज
उल्हासनगर मध्ये पहिल्याच पावसात मुख्य रस्ता झाला जलमय दिनांक 24 जून 2022  दृश्य आहे शांतीनगर शमशान भूमी चौक कल्याण अंबरनाथ रोड उल्हासनगर ३ येथील हा रस्ता आहे याचं रस्त्यावरून लाखो वाहने रोज ये जा करीत असतात कल्याण अंबरनाथ रोड वरून दिवसाला शेकडो एम्बुलेंस गाड्या पेशंट ला घेऊन ये जा करीत असतात नेमके त्याच रस्त्यावर पहिल्याच पावसात  पाणी साचल्याने वाहन चालक व रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करत पाण्यातून प्रवास करावा लागला ? उल्हासनगर महानगरपालिका चे संबधित अधिकारी यांनी त्वरित लक्ष केंद्रित करून योग्य उपाय योजना करावी अन्यथा या पुढे येणाऱ्या मुसळधार पावसात उल्हासनगर शहरात रस्त्यावर पाणी साचून जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.       ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर __________________________________________ बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा  संपादक हरी आल्हाट 9960504729

जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष मा.अशोकराव आल्हाट, नागपूर चा विशेष दौरा करून मुंबईत परतले

इमेज
जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष मा.अशोकराव आल्हाट, नागपूर चा विशेष दौरा करून मुंबईत परतले या दौऱ्यामधे त्यांनी महाराष्ट्रातील  विविध पक्ष व सामाजिक संघटना चे प्रमुख यांना भेट देवून त्यांच्या सोबत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. ज्या ज्या मान्यवरांना भेटी  दिल्या त्या सर्वांनी नव्याने निर्माण केलेल्या लोकशाही आघाडी, मधे जाहीर प्रवेश करणार असल्याचे सांगितले असून  नागपूर शहरातील अनेक संघटना व पक्ष प्रमुखांची या वेळी बैठक संपन्न झाली, या वेळी,मा,खा, हरिभाऊ राठोड मा आमदार उपेंद्र शेंडे,खोरिपा, मा, आनंदा ओहळ, तसेच  अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकी पार पडल्या  जनहित लोकशाही पार्टी चे, विदर्भ अध्यक्ष,मा साहेबराव साबळे पाटील,हे विशेष उपस्थित होते. त्यांनी मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी लोकशाही आघाडी च्या माध्यमातून अनेक कार्यक्रम चालू केले आहेत लोकशाही आघाडी ची विजयी घोडदौड आता कोणीही रोखू शकत नाही, असे अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात बैठका सत्र सुरू झाले आहे. जनहित लोकशाही पार्टी चे महाराष्ट्र अध्यक्ष मा, रामराव महा...

आरक्षण विरोधी पक्षाच्या सशक्त पर्याय उभारणार बहुजन समाजातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या बैठकीत निर्धार

इमेज
आरक्षण विरोधी पक्षाच्या सशक्त पर्याय उभारणार बहुजन समाजातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या बैठकीत निर्धार नागपूर : राज्यातील चारही महत्त्वाचे पक्ष हे आरक्षण विरोधी आहेत. यांनी बहुजन समाजात फूट पाडून आपली राजकीय पोळी शेकली आहे. येणाऱ्या निवडणुकीत या प्रमुख राजकीय पक्षाच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्यासाठी बहुजन समाजातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या ५० प्रतिनिधींची बैठक रवी भवनात पार पडली. बैठकी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून प्रस्थापितांना धक्का देण्याचा निर्धार करण्यात आला कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे. यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीला मार्गदर्शक म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड. माजी आमदार उपेंद्र शेंडे. प्रा एन व्ही ढोके.रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे राष्ट्रीय सरचिटणीस देशक खोब्रागडे. जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष अशोकराव आल्हाट. कम्युनिस्ट पार्टीचे अरुण बनकर. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हरीश ऊईके. भीम आर्मी चे संजय फूलझेले. भाऊसाहेब बावणे. जनार्दन मून. रा स्व सं चे प्रा रमेश राठोड. प्रा मनीष वानखेड...

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी .सुशांत शेलार व रिक्त झालेल्या प्रमुख कार्यवाह पदी रणजित उर्फ बाळा जाधव* यांची निवड

इमेज
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची कार्यकारी मंडळाची बैठक कोल्हापूर येथे संपन्न झाली या बैठकीत संस्थेच्या अध्यक्ष पदी *श्री.सुशांत शेलार* यांची निवड करण्यात आली व रिक्त झालेल्या प्रमुख कार्यवाह पदी *श्री.रणजित उर्फ बाळा जाधव* यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी त्यांचे अभिनंदन समस्त पदाधिकारी व कलावंत यांनी केले.             प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्यूज महाराष्ट्र __________________________________________ बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729       संपादक हरी आल्हाट 

जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या मार्गदर्शन सभेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

इमेज
जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या मार्गदर्शन सभेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप  उल्हासनगर : जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती ची मार्गदर्शन सभा दि. १९ जून २०२२ रोजी उल्हासनगर , आनंद नगर फर्स्ट गेट येथील आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आली  मार्गदर्शन सभा  मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली  ह्या सभेत उल्हासनगर शहर कार्यकारिणी व इतर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या  या कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करून पुढील   सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी  उत्तम प्रकारे  मार्गदर्शन ही केले उल्हासनगर परिवहन विभागाचे उपनिरीक्षक जगदीश मोकल यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ दिला व उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केले  सामाजिक प्रतिष्ठान चे सचिव समाधान प्रधान, सल्लागार दिपक मोरे तसेच ज्येष्ठ समाजसेवक गौतम ढोके , समाजसेवक महेंद्र रणपिसे, समाजसेवक विनोद सोनावणे, अशोक खवले,...

उल्हासनगर मधील सिमरन सेवा NGO.चे संस्थापक राजकुमार शर्माजी यांचा वाढदिवस साजरा

इमेज
उल्हासनगर मधील सिमरन सेवा NGO.चे संस्थापक राजकुमार शर्माजी यांचा वाढदिवस साजरा सिमरन सेवा संस्थेचे संस्थापक राजकुमार शर्मा यांच्या वाढ दिवसाचे औचिते साधून गरीब गरजू लोकांना अन्नधान्य व लहान मुलांना कपडे आणि खाऊ वाटप करण्यात आला व उल्हासनगर केंप नंबर 5 येथील वृध्द आश्रम मध्ये मदत कार्य करून वाढ दिवस साजरा करण्यात आला तसेच त्यांच्या कार्यालयात केक कापुन वाढ दिवस साजरा करण्यात आला  या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल व साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक हरी आल्हाट यांनी राजकुमार शर्मा यांच्या कार्याचे कौतुक करून वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच अंध हितकारी संस्थेचे जगदीश पटेल यांनी शर्मा यांच्या केलेल्या कार्याचे महत्त्व पटवून दिले व वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ नागरिक दादा भगतराम यांनी शर्मा यांना पुढील वाटचाली साठी आशीर्वाद दिला समाज सेवक आनंद गांगुर्डे यांनी तसेच अभिषेक मोरे यांनी उपस्थित राहून शर्मा यांना शुभेच्छा दिल्या या वेळी देविदास भारवानी. धनराज माखीजा. कुलदीप आयलसिंघानी. उपस्थित होते  ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महारा...