अभिनेत्री अमृता पत्की हिने ग्लॅमर विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला



अभिनेत्री अमृता पत्की हिने ग्लॅमर विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला 
मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर
२००६ च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’चा किताब मिळवला होता. अमृताने २०१०मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली ही गुणी अभिनेत्री आता बऱ्याच कालावधीनंतर ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 
सध्या मराठी चित्रपटात बॉलीवूड तारका आयटम साँगवर थिरकताना दिसतायेत. या यादीत अमृताचाही समावेश झाला आहे. अमृता पत्की हिच्या नृत्याचा जलवा ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. 
रापचिक रापचिक कोळीणबाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात अमृताचा नखरेल अंदाज पहायला मिळणार आहे. नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. संतोष दरेकर, मंगेश ठाणगे, देव चौहान यांनी लिहिलेल्या गाण्याला देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. ममता शर्मा आणि देव चौहान यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सच्या ‘सुर्या’ हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट ६ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. हसनैन हैद्राबादवाला यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल’ असा विश्वास अमृताने व्यक्त केला. 

‘सुर्या’ चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. साहसदृश्ये अब्बास अली मोघल आणि मोझेस फर्नांडिस यांची आहेत. रेश्मा मंगेश ठाणगे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, प्रसाद मंगेश, चेतन मंगेश हे या चित्रटाचे सहनिर्माते आहेत. संग्राम शिर्के या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729
मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप