भाई कोतवाल व हिराजी पाटील यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाला ७९ वर्षे पूर्ण डिकसळ येथून सिद्धगड कडे मशाल फेरीचे आयोजन नेरळ हुतात्मा चौक आणि हुतात्मा स्मारक येथे स्वागत
भाई कोतवाल व हिराजी पाटील यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाला ७९ वर्षे पूर्ण डिकसळ येथून सिद्धगड कडे मशाल फेरीचे आयोजन नेरळ हुतात्मा चौक आणि हुतात्मा स्मारक येथे स्वागत
कर्जत बातमीदार दिलीप वाघ कर्जत तालुक्यातील माथेराननये विर हुतात्मा भाई कोतवाल आणि मानीवली येथील हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डिकसळ येथील समांतर प्रतिष्ठान आणि तरुणांनी डिकसळ ते हुतात्म्यांचे बलिदान झालेले स्थळ सिध्दगड कीला अशी मशाल फेरी काढली. दरम्यान, या मशाल फेरीचे नेरळ येथील हुतात्मा स्मारक आणि मानीवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे स्वागत करण्यात आले. अनेक गावातून मशाल या सिद्धगड येथे पोहचत असतात. यावर्षी कर्जत नेपळ रस्त्यावरील डिकसळ गावातील तरुणांनी समांतर प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून मशाल फेरीने डिकसळ ते सिद्धगड जाण्याचा निर्णय घेतला होता. एक जानेवारी रोजी सायंकाळी डिकसळ येथे जेष्ठ ग्रामस्थ वसंत पाटील यांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलीत करण्यात आल्यानंतर मशाल फेरीला सुरुवात झाली.
४० किलोमीटर अंतर पार करीत असताना या क्रांतिज्योतीचे नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारक समिती यांच्याकडून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वसंत पाटील, कृष्णा म्हात्रे सर, अनंत कडव हे होते. तसेच हुतात्मा चौक नेरळ येथे संतोष पेरणे यांच्या हस्ते तर मानिवली येथे सरपंच तुषार गावली यांच्या हस्ते मशालीचे स्वागत करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन श्री. मंगेश ठाकूर सर यांनी चांगल्या प्रकारे केले
कैलास वाघ सर, दिलीप वाघ, शिवाजी नाईक, मंगेश देशमुख, निलेश पाटील, रवी जाधव, सपरेश साळोखे, मोहन काम्बरी, चेतन भासे, गणेश कडव, प्रकाश कोकरे, दत्ता हंबीर, रोशन खोपडे, अक्षय हिरे, ओमकार खोपडे, ऋषिकेश पाटील, रामदास तुपे, सुमित बुधाटे, ऋतुजा ठाकूर, सोनाली वाघ, अनिता ठाकूर, वसंत पाटील बाबा, पपेश बुंधाटे. तसेच चहा नाश्ताची व्यवस्था सुमित गुप्त सर, विजय शेळके, समीर घरत (म्हसा ), रामदास काम्बी (पोशीर) यांनी केली.
ही मशाल फेरी हुतात्मा चौकातून नेरळ गावात हुतात्मा हिराजी पाटील चौकात पोहचली. तेथे अभिवादन करून माथेरान नेरळ कळंब रस्त्याने मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे पोहचली. तेथे हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मशाल फेरी कळंब रस्त्याने कळंब येथे पोहचली. कळंब येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन करून कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने म्हसा येथे पोहचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून म्हसा धसई रस्त्याने जांबुर्डे येथे पोहचली. जांबूर्डे येथून सिद्धगड हा जंगलातील रस्त्याने प्रवास करीत मध्यरात्री एक वाजता सिद्धगड येथील पायथा येथे पोहचली आणि पहाटे अन्य सर्व मशाल यांच्यासोबत हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदान स्थळी पोहचली. तेथे मुरबाड सिद्धगड स्मारक समिती यांच्याकडून स्वागत केले गेले
संपादक हरी आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद