बहुजन संग्राम संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सचिन गायकवाड यांची निवड
बहुजन संग्राम संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सचिन गायकवाड यांची निवड
बहुजन संग्राम या महाराष्ट्र व्यापक ,सामाजिक,विधायक, सेवाभावी व मानवतावादी संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीया या राज्यस्तरीय व्रूत्तसंस्थेच्या ठाणे जिल्हा प्रतिनीधी म्हणून बहुजन संग्रामचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी सचिन गायकवाड यांची निवड केली आहे
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील, महात्मा फूले,राजर्षी शाहू महाराज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,प्रबोधनकार ठाकरे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांचा मी पाईक आहे.तसेच भारतीय संविधान आणि त्यातील समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधूता,धर्मनिरपेक्षता ही मुल्ये मला शिरसावंद्य आहेत.आपल्या बहुजन संग्रामच्या ध्येय उद्दिष्ठांसाठी कार्यरत राहून संघटनेचा जनाधार आणि लौकीक वाढवण्यासाठी मी कटीबद्ध होत आहे.असे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सचिन गायकवाड यांनी सांगीतले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद