महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पाठ पुराव्याला अखेर यश महापालिका आयुक्त यांच्या दालनात बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पाठ पुराव्याला अखेर यश महापालिका आयुक्त यांच्या दालनात बैठक संपन्न  
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) 
उल्हासनगर महापालिका आयुक्त यांच्या दालनात
१८ जानेवारी २०२३ रोजी कामगारांच्या एकूण ११ मुद्दे यावरील  विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या सोबत चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते 
या बैठकीत कामगारांच्या एकूण ११ मुद्दे यावर विविध प्रलंबित विषयावर चर्चा करण्यात आली 
११ मागण्या पैकी महत्त्वाच्या मागण्या खालील प्रमाणे   ( ४ ) सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेकडून देय असलेली रक्कम सेवानिवृत्तीच्या दिवशीच देण्यात यावी
( ५ ) सातव्या वेतनाची थकबाकी असलेली अर्धी रक्कम रोखीने देण्यात यावी व  उर्वरित रक्कम रुपये ५०००/ प्रमाणे देण्यात यावी असे अनेक मुद्दे याविषयी निवेदन पत्र देऊन चर्चा करण्यात आली
महापालिका आयुक्त अजीज शेख, यांनी चर्चा करताना  सांगितले सर्व संघटना समान आहेत कुणावरही अन्याय होणार नाही आम्ही आपल्या मुद्देवरील चर्चा करुन विविध मागण्या पूर्ण करु असे आश्वासन आयुक्त अजिज शेख यांनी कास्ट्राईब महासंघ यांना दिले 
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब या संघटनेची  दखल घेवून उल्हासनगर  महापालिकेचे सफाई कर्मचारी मुकादम यांना पदोन्नती देण्यात आली
खेळीमेळीच्या वातावरणात हि बैठक संपन्न झाली  उप आयुक्त अशोक नाईकवडे, अतिरिक्त आयुक्त (सेवा) करुणा  जुहीकर मॕडम , मुख्यलेखा अधिकारी किरण भिलारे, साहयक (स. प्र. वि) अच्युत सासे , महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत (आप्पा ) जाधव , उ. म. पा अध्यक्ष दिपक मांडविया, सहसचिव प्रकाश देवरे, प्रसिद्धी प्रमुख अशोक एफ शिरसाट , संघटक राजेश फक्के , अग्नीशमन दलाचे अध्यक्ष धनंजय शिरसाट , यांच्यासह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
अशी माहिती प्रतिनिधी अशोक शिरसाट यांनी दिली
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार