अशोक शिंदे यांच्या 'सूफी तरंग’ला मराठा मंदिरचा संशोधनात्मक साहित्य पुरस्कार मुंबई (गणेश तळेकर) :

अशोक शिंदे यांच्या 'सूफी तरंग’ला मराठा मंदिरचा संशोधनात्मक साहित्य पुरस्कार
मुंबई (गणेश तळेकर) : मराठा मंदिर संस्थेचा यंदाचा प्रतिष्ठेचा संशोधनात्मक साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांच्या 'सूफी तरंग’ या पुस्तकाला प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव आणि भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिरच्या वास्तूत झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
हजरत अल्हाज ख्वाजा मजिदूल हसन शहा हसनी यांच्या मानवतावादी मजिदिया पंथाच्या प्रेरणेतून साकारलेल्या या पुस्तकासाठी सूफी फैजुल हसन शहा मजिदी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. सूफी पंथाचा उदय, गुरुभक्तीचे मार्ग, सूफी विचारधारा, विविध सूफी संप्रदाय, जगभरातील आणि भारतातील सूफी संत, खानकाह (मठ, आश्रम), सूफी संगीत, हिंदू आणि सर्वधर्मीयांशी असलेले आपुलकीचे नाते, श्रद्धास्थाने, याकूब बाबांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली श्रद्धा आदी विविद मुद्यांचा परामर्श यात घेण्यात आला आहे. त्यासाठी जगभरातील अनेक संदर्भ ग्रंथांचा तसेच प्रत्यक्षात चर्चेतून उलगडलेल्या अनेक मुद्यांना अशोक शिंदे यांनी शब्दबद्ध केले आहे.
जनहित न्यूज महाराष्ट्र ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप