कारखान्यात स्फोट अन् सहा महिलांचा जागेवरच मृत्यू

कारखान्यात स्फोट अन् सहा महिलांचा जागेवरच मृत्यू
पिंपरी/चिखली: तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल तयार करण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला. तर नऊ महिला व एक पुरुष कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना पुणे येथील ससून रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

तळवडेतील ज्योतिबानगर परिसरात शुक्रवारी (ता. ८) दुपारी तीन वाजता ही दुर्घटना घडली. हा प्रकार समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली जखमी आणि मृत महिलांना बाहेर काढले. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

गंभीर जखमींपैकी दोन महिला सुरूवातीलाच ससून रुग्णालयात पाठविल्या होत्या. उर्वरित सात गंभीर महिला व एका पुरुषावर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बर्न वॉर्ड नसल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले..

वायसीएमला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. खासदार श्रीरंग बारणे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, नामदेव ढाके, कार्तिक लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे, सुलक्षणा धर-शिलवंत आदींनी वायसीएमला भेट दिली

स्पार्कल कॅण्डल बनविण्याच्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाल्याने जागेवरच सहा महिलांचा मृत्यू झाला. आग इतकी भयंकर होती की मृतांची ओळख पटणे मुश्किल झाले होते. राणा इंजिनिअरिंगच्या कंपाऊंडमध्ये एका छोट्या औद्योगिक शेडमध्ये हा छोटा कारखाना होता. रेडझोन असल्याने या भागात बहुतांश औद्योगिक शेड अनधिकृत आहेत. या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार