5 जुन पर्यावरण दिवस विशेष... उल्हासनगर महानगर पालिका तर्फे शेवटचे पर्यावरण सद्यस्थिती अहवाल कधी बनवले गेले? 5 जुन पर्यावरण दिवस विशेष उल्हासनगर महानगर पालिका तर्फे शेवटचे पर्यावरण सद्यस्थिति अहवाल कधी बनवले गेले ?प्रतिनिधी : हरि आल्हाट राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व महानगर पालिकांनी प्रतिवर्षी ३१ जुलै पर्यंत पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल त्यांच्या सर्वसाधारण सभेपुढे सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर प्रत्येक महापालिकेने त्यांच्या पद्धतीप्रमाणे अहवाल करणे आवश्यक असताना उल्हासनगर महानगर पालिका तर्फे गेली कित्येक वर्षे पर्यावरण सद्यस्थिती अहवाल, एनवायरमेंट स्टेटस रिपोर्ट बनवला नाही व जनते समोर सादर सुद्धा केलेला नाही,अहवाल तयार करताना पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया व निःस्सारण, घनकचरा व त्याची विल्हेवाट, वृक्षांची संख्या व वर्गीकरण, पाणी, हवा, वायू प्रदूषण आणि त्यांचे पृथःकरण या बाबींचा समावेश करण्याच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत. त्याचा विचार करून शहरातील पर्यावरणाची सद्य:स्थिती मांडणारा अहवाल पालिकेने तयार केला पाहिजे होता, परंतु तसे काही निदर्शनास येत नाही,उल्हासनगर शहर हे जल, वायु व ध्वनि प्रदूषणात सर्वात जास्त प्रदूषित शहर म्हणुन घोषित केले गेले आहे,उल्हासनगर हे १३ किलोमीटरचे शहर आहे. आकारापेक्षा कैक पटींनी शहरातील लोकसंख्येची घनता अधिक आहे. त्यामुळे व्यवसायाभिमुख शहरात औद्योगिकीकरणामुळे सततच्या वर्दळीचा त्यात विशेषतः वाहनांच्या वर्दळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या देशातील ९४ शहरांच्या यादीत उल्हानगर हे व्यापारी शहरही मागे राहिलेले नाही. केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील हवा प्रदुषित आणि आरोग्यासाठी घातक असल्याचा निष्कर्ष काढला आहे. प्रदूषणाचा उल्हासनगरमधील नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्यापूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.उल्हासनगर हे व्यवसायाभिमुख शहर असून, शहरात व्यापारासाठी दिवसभर नागरिकांची आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे शहरातील वाहनांमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. तसेच शहरातून जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर वाहतुकीचे नियोजन नसल्याने सातत्याने उद्भवणारी वाहतूक कोंडी प्रदूषणात अधिक भर घालत आहे. शहरात डिझेल वाहनेही वाढत आहेत.शहरात सिमेंटचेच जंगल उभे राहत असल्याने हरित पट्ट्याचा अभाव आढळतो. अस्वच्छता, शहरातील वाढता घनकचरा त्याच जागेअभावी वाढणारे कचऱ्याचे डोंगर आणि त्या कचऱ्यांच्या डोंगरांना सातत्याने लागणारी आग आणि आगीतून उठणारा धूर हे चक्र शहरातील हवेत प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच स्थानिक संस्थांकडून प्रदूषण रोखण्यासाठी कुठलीही उपाययोजना अंमलात आणली जात नाही. सतत होणाऱ्या लहान-मोठ्या बांधकामांमधून धुळीचे प्रमाण वाढत जाते. अशा अनेक कारणांमुळे शहरातील प्रदूषणाची पातळी वाढत आहे.शहरातून वाहणारी वालधुनी नदी अत्यंत प्रदूषित आहे तर पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी सुद्धा हळूहळू वालधुनी नदी बनायच्या मार्गावर आहे,कमी जागेमध्ये सर्वात जास्त लोक वस्ती असलेल्या उल्हासनगर सारख्या व्यवसायाभिमुख शहरांना असेच वेगळे निकष लावण्याची वेळ आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार