उल्हासनगर महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या

उल्हासनगर महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या 

उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती क्रं-४ चे सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी महेंद्र पंजाबी, आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हिललाईन पोलीस ठाण्यात लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाला. याप्रकारने महापालिका व प्रभाग समिती कार्यालयातील सावळागोंधळ उघड झाला. लाचेच्या गुन्ह्याप्रकरणी महापालिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल आल्यावर, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले. दरम्यान गुरुवारी आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यापुढे गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा दम अधिकाऱ्यांना आयुक्तांना दिल्याचें समजते.

महापालिका प्रभाग समिती क्रं-१ चे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांची प्रभाग समिती क्र-४ च्या सहायक आयुक्त पदी तर प्रभाग समिती क्र-३ चे सहायक आयुक्त अजित गोवारी यांची प्रभाग समिती क्र-१ पदी सहायक आयुक्त पदी बदली करण्यात आली. तर भांडार विभाग प्रमुख पदी असलेले दत्तात्रय जाधव यांची प्रभाग समिती क्र-३ च्या सहायक आयुक्त पदी नियुक्ती केली. अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांचे स्वीय सहायक अंकुश कदम यांची भांडार विभाग प्रमुख पदी बदली करण्यात आली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्याकडे अतिक्रमण प्रमुख ही जबाबदारी कायम राहणार आहे. मोडकळीस आलेल्या बांधकामाला परवानगी देण्याच्या नावाखाली लाच घेणाऱ्या सहायक आयुक्त महेंद्र पंजाबी यांच्यासह प्रभाग समिती क्र-४ मधील लाचखोर कर्मचाऱ्यांची महापालिकेने कार्यालया अंतर्गत चौकशी करण्याची मागणी होत आहे. 
रस्ता रुंदीकरणांचा नावाखाली बांधकामे 
कॅम्प नं-५ स्वामी शांती प्रकाश शाळे समोरील रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेने केले. मात्र रस्ता रुंदीकरणांचा नावाखाली बहुमजली व बाधित न झालेल्या दुकानाची अवैध कामे बिनधास्त सुरू आहेत. आदींच्या तक्रारी प्रभाग समिती क्रं-४ च्या कार्यालयाकडे आल्या आहेत. रस्ता रुंदीकरणांच्या आड अवैध व वाढीव बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप