राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेने लाक्षणिक उपोषणाची नोटीस एसटी महामंडळाला दिली

मुंबईः एसटी महामंडळातील एसटी कामगार संघटनेने पुन्हा एकदा एसटीसंपाची चाचपणी सुरू केली आहे.  एसटी कर्मचाऱ्यांचे २०२०पासून थकीत देणी तातडीने देणे, मॅक्सीकॅबला प्रवासी परवाने देऊ नये या आणि अशा एकूण ३४ मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेने लाक्षणिक उपोषणाची नोटीस एसटी महामंडळाला दिलेली आहे. आज, गुरुवारी संपाच्या नोटीसवर महामंडळात चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेकडे परिवहन आणि एसटी महामंडळ असताना कर्मचाऱ्यांना आयते कपडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या एसटी गणवेशात अनेक त्रुटी असल्याने आधीप्रमाणे कापड आणि शिलाई भत्ता द्यावा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे. मे २०२२ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांनी मॅक्सीकॅबला प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यासाठी समिती स्थापन केलेली होती. एसटी वाहतुकीला धोका निर्माण होणाऱ्या मॅक्सीकॅबला मंजुरी देऊ नये, तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, खात्यामार्फत बढती परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्याचा फेरतपासणी करावी, २०२० पासून थकीत वैद्यकीय भत्ता तातडीने कर्मचाऱ्यांना द्यावा, या मागण्यांसाठी २२ ऑगस्टला उपोषणाची नोटीस देत १७ सप्टेंबरपासून उपोषणाची हाक कामगार संघटनेने दिलेली आहे.
एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी महामंडळाच्या कामगार विभागातील महाव्यवस्थापकांनी आज,गुरुवारी१५ सप्टेंबरला दुपारी २ वाजता चर्चेचे आयोजन केले आहे. या बैठकीत उपोषणाच्या नोटीसवर चर्चा करण्यात येणार आहे, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जवळपास सहा महिने एसटी कर्मचार्यांचा संप सुरू होता. मार्च २०२२मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास सुरुवात केली. संपकाळात पगाराविना आर्थिक संकटापुढे टिकाव न धरू शकलेल्या८०हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. संपकाळात कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या चालकांचेही काम थांबवण्याचा निर्णय महामंडळाने नुकताच घेतला आहे
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप