शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद, द्वारा अस्मिता मेश्राम, साहित्यिक व स्त्री दर्पण च्या संपादिका यांच्या मुख्य संयोजनात, "महामानवांचा जयंती उत्सव सोहळा
शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद, द्वारा अस्मिता मेश्राम, साहित्यिक व स्त्री दर्पण च्या संपादिका यांच्या मुख्य संयोजनात, "महामानवांचा जयंती उत्सव सोहळा
दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी तक्षशिला बुद्ध विहार सुभाष टेकडी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 याठिकाणी शाक्यसिंह बुध्दीष्ट सोसायटी औरंगाबाद द्वारा अस्मिता मेश्राम साहित्य व स्त्री दर्पण च्या संपादिका यांच्या मुख्य संयोजनात महा मानवांचा जयंती उत्सव सोहळा निमित्त कवयित्रिंचे एक दिवसीय कवी संमेलन घेण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान कल्पना एस.वाहुळे कवयित्री उल्हासनगर, ठाणे यांनी भुषविले,
तर उद्घाटक म्हणून पुज्य भंते आनंद महाथेरो कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच साक्षी डोळस, सिमरन सिंग, माधुरी सपकाळे ह्या प्रमुख पाहुणे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यसंयोजिका अस्मिता मेश्राम यांनी केले. महिलांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून, कला व गुणांच्या माध्यमातून व्यक्त व्हावं म्हणून शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद, स्वयंप्रेरणेने अशा कार्यक्रमाचे आयोजन करीत असते." असे त्या प्रास्ताविकात बोलल्या. अध्यक्षा कल्पना वाहुळे यांनी महिलांनी पुढे व्हावं. स्वताचा विकास करावा. जुन्या अंधश्रध्दात्मक रूढी परंपरा सोडाव्यात यावर मार्गदर्शन करून रचना सादर केली.
सिमरन सिंग ह्या स्वत: तॄतीयपंथी असतांना समाज कसा या संवर्गातील लोकांसोबत भेदभाव करतो, यावर मनोगत व.यक्त करून, त्यांच्या सामाजिक कामाची भूमिका मांडली.
तर साक्षी डोळस व माधूरी सपकाळे यांनी सामाजिक कार्याची महती पटवून देणारे वक्तव्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता अहिरे यांनी केले..
या कार्यक्रमात अनेक कवयित्रींनी आपल्या दर्जेदार व हॄदयाला भिडणाऱ्या रचना सादर करून कवी संमेलन यशस्वी करण्याचे योगदान दिले
अशी माहिती साक्षी डोळस यांनी दिली
__________________________________________
प्रेम लागी जीवा या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र मध्ये चांगला प्रतिसाद. कस्तुरी फिल्म इंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत निर्माती प्राजक्ता खांडेकर निर्मित मराठी चित्रपट प्रेम लागी जीवा महाराष्ट्रातील २५ सिनेमागृहात प्रदर्शित झाला . पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला अनेक चित्रपट गृह हाउसफुल होते निर्माती प्राजक्ता खांडेकर यांचा हा पहिलाच चित्रपट महाराष्ट्रातील. आशिष (निरा ) साय. ६.३० वाजता नवनाथ (वानेवाडी) साय.६.३० वाजता. शिवम (रांजणगाव) दुपारी १२.३०वाजता आशा (सोलापूर) १२.३०वाजता साई समर्थ ( मुसळगाव )१२.३० वाजता प्रभात (रहिमतपूर) ६.३० वाजता एस एन ( करकंबा) ६.३० वाजता वसंत (कुडोली) ६.३०वाजता सिधनाथ (आटपाडी) ६.४५ वाजता राजलक्ष्मी (लोणंद) ६.३० वाजता. जय हिंद (इस्लामपूर ) १२.३० वाजता , शिवरत्न (फर्हटा) १२.वाजता बालाजी ( शिखरापुर )१२.०० वाजता. अप्सरा ( कोल्हापूर )१२.०० वाजता. सिध्देश्वर ( सावलज ) ६.०० वाजता. प्लाझा (( सावर्डा ) ६.००वाजता.जय हिंद ( मुरगूड)६.०० वाजता. आंबा अप्सरा ( औरंगाबाद )३.४५ वाजता. श्रीनाथ (परळी ) ६.०० वाजता . रिगल ( लातूर ) सकाळी १०.४५ वाजता. आर के ( उदगीर ) १२.१५ वाजता. मोहन (अंबेजोगाई ) ११.००वाजता.प्रिया (अमरावती ) सकाळी ९.१५ वाजता. अलंकार ( नागपूर ) सकाळी ९.१५ वाजता लक्ष्मी (हिंगणघाट ) सकाळी १०.०० वाजता या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे अनेक चित्रपट गृहात हाउसफुल झाला असल्याची माहिती निर्माती प्राजक्ता खांडेकर यांनी दिली आहे सध्या मराठी चित्रपटाला प्रेक्षक येत नाहीत असे म्हणतात परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल चित्रपटाची निर्माती प्राजक्ता खांडेकर यांनी सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहे. सध्या प्रेम लागी जीवा या चित्रपटाची निर्माती व सह निर्माते नागेश थोंटे . या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करीत असलेले सोमनाथ लोहार. वैशाली साबळे. तसेच हर्षद पठाडे आणि सह कलाकार सध्या दौऱ्यावर असून प्रेम लगी जीवा हा चित्रपट ज्या चित्रपट गृहात सुरू आहे अशा ठिकाणी भेटी देत आहेत अशी माहिती निर्माती प्राजक्ता खांडेकर यांनी दिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद