कल्याण मध्ये भीम जयंती उत्साहात साजरी
कल्याण येथे
भीमजयंती उत्साहात साजरी
==================
कल्याण दि.14 (प्रतिनिधी )
डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान व संविधान सैनिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 131 वा जयंती महोत्सव नालंदा बुद्ध विहार काटेमानिवली, कल्याण पूर्व येथे धम्मसेविका कमल जाधव यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.
प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला आणि बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण करण्यात आले. या प्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया ठाणे शाखेचे मॅनेजर प्रवीण नागवंशी यांनी पुष्प देऊन प्रमुख अतिथीचे स्वागत केले. डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे यांनी काव्य
मय पद्धतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
जेष्ठ नेते डॉ आंबेडकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष बी जी पवार, संविधान सैनिक संघाच्या आणि महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुनीता खैरनार, समाजसेवक मिलिंद खरे, बँकेचे निवृत्त अधिकारी बाळासाहेब बागुल यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर विचार मांडले.
डॉ आंबेडकर महिला प्रतिष्ठानच्या सचिव अलका साळवे, प्रेमा न्यायनित, लता तावडे लता भालेराव, सुनंदा निवाणकर, कल्पना मधाळे आदी महिला कार्यकर्त्यांनी भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नायब तहसीलदार दशरथ मोरे, पत्रकार विनोद बारहे, मेजर बाबाराव तेलगोटे, डॉ. अनिता त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वश्री मनोहर हिरे, नरेंद्र पगारे, मुनीराज डोंगरे, रमेश साळवे, प्रकाश माने, महिला कार्यकर्त्या मीना अहिरे, गंगा साळवे, कलावती कांबळे, शोभा रणबागले आदींचा यथोचित सत्कार करण्यात आला. शेवटी नालंदा बुद्ध विहाराचे अध्यक्ष काशिनाथ पवार यांनी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रमाचा समारोप केला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद