भागो भागो किन्नर आया है... उल्हासनगरच्या रस्त्यांवर पथ नाट्य
तृतीयपंथीयांनी सांस्कृतिक, सामाजिक, कायदेशीर लढाई लढत तृतीयपंथीयाना न्याय, हक्क मिळवून दिला. अशा तृतीयपंथीयांच्या नावाने दृश्यता दिवस जगभर साजरा करण्यात येतो.
याच निमित्याने 'ट्रांसजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटी जागितिक स्तरावर 31 मार्च पासून सप्ताह सुरू झाला असून याच सप्ताह निमित्ताने उल्हासनगर शहरातही शेकडो तृतीयपंथीय एकत्र येत रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान 'भागो, भागो किन्नर आया' हे पथनाट्य सादर करण्यात आले होते.
तृतीयपंथीय समाजाला भारतीय संविधानाने दिलेले हक्काच्या अधिकाराची माहिती व्हावी यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. हेच अधिकार त्यांना समाजात पुन्हा आणण्यास मदत मिळणार असल्याचे वान्या फाउंडेशन अध्यक्ष रेखा ठाकूर, किन्नर अस्मिता सामाजिक संस्थाच्या तमन्ना केणी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही रॅली उल्हानसागर कॅम्प नंबर 1 मधील 24 नंबर शाळेतून सुरू होऊन गोलमैदान समोर तृतीय पंथीयांना समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीवर आणि त्यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर करण्यात येऊन महापालिकेच्या समोर रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीत उल्हासनगर महानगर पालिका उपआयुक्त जमीर लेंग्रेकर, प्रियंका राजपूत, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे, यांच्यासह दोनशेहून अधिक तृतीय पंथीयांनी सहभाग घेतला होता.
__________________________________________बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा संपादक हरि आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद