कवितेच्या सावलीत "नवकोरं" ला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला

कवितेच्या सावलीत "नवकोरं" ला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला 
'नवंकोर' हा कार्यक्रम वायर्ड एक्स्प्रेसन आणि ठीक्करबिल्ला निर्मित, संकल्प थिएटर आणि कल्चरल अकॅडमी मुंबई आयोजित हा कार्यक्रम नुकताच दिनांक :- १०/७/२०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता दादर माटुंगा कल्चर सेंटरमध्ये सादर करण्यात आला. 
मराठी प्रेक्षकांच्या कवितेविषयी असलेल्या भावना लक्षात घेऊन आजवर अनेक कार्यक्रम झाले आहेत. पण, नवंकोरं काहीतरी नवं रसिक प्रेक्षकांच्यासमोर सादर करण्यात आले. नव्या दमाचे तरुण कवींनी एकत्र येऊन, जुने आणि नवे प्रवाह एकत्र करत कवितांची नवी चळवळ उभारू पाहली.
 संकेत अरुण म्हात्रे, प्रथमेश किशोर पाठक, आदित्य प्रवीण दवणे आणि स्पृहा जोशी हे सादरकर्ते आपल्या कविता, गझल, गप्पांमधून प्रेक्षकांना काही नवं देण्याचा प्रयत्न केला. नवीन तसेच ज्येष्ठ कवींच्या कविता या दोन तासांत ऐकायला मिळाल्या रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी चंदर आल्हाट ,9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप