कस्तुरी फिल्म एंटरटेनमेंट वर्ल्ड निर्मित प्रेम लागी जीवा हा मराठी चित्रपट 22 एप्रिल रोजी प्रदर्शित

नागपूर : कस्तुरी फिल्म एंटरटेनमेंट वर्ल्ड निर्मित 'प्रेम लागी जीवा'  हा मराठी चित्रपट २२ एप्रिलला प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या  प्राजक्ता खांडेकर तर  सहनिर्माता नागेश थोंटे आहेत. दिग्दर्शक सोमनाथ लोहार तसेच  असोसिएट दिग्दर्शक हर्षद पठाडे आहेत. चिटपटाचे चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील वाढवना या गावी व आजूबाजूला तसेच कोकणातील हिदवीबीच वर झाले आहे. याचे डिस्ट्रीब्यूटर पिकल एंटरटेनमेंट मिडीया प्रायवेट लि. मुंबई असून पोस्ट प्रोडक्शन साईराज मीडिया मुंबई व जे के स्टुडिओ मुंबई आहेत. 

चित्रपट निर्मिती संस्था नागपूरची असून नागपूरकर रसिक प्रेक्षक व श्रोत्यांचा विशेष अभिमान आहे. 'प्रेम लागी जीवा' या चित्रपटाच्या पोस्टर चे प्रकाशन  दि १६ मार्च रोजी पत्रकार प्रेस क्लबमध्ये सायंकाळी  ५.०० वा. होत आहे. झी म्युझिक कंपनी या चैनलवर १७ मार्च पासून चित्रपटाच्या गीतांचे प्रसारण होणार आहे.या चित्रपटात टायटल सॉंगसह एकूण चार गीते आहेत.

या कलावतांनी भूमिका साकारल्या 

सोमनाथ लोहार,वैशाली साबळे, प्राजक्ता खांडेकर, रवींद्र ढगे, नागेश थोंटे, जॉनी रावत, राजेंद्र जाधव,हर्षद पठाडे, मयुरी नव्हाते, राजश्री अहिरे,माधुरी वरारकर,श्री खराडे,रविराज सागर,साक्षी सावंत,दीपाली लोहार,आकाश दळवी, विष्णू उपाद्ये, राजेंद्र कांबळे, अनिल सुरवसे, ज्योती पाटील, वैष्णवी बारूरे, बाल कलाकार सौंदर्या स्वामी, कथा /पटकथा /संवाद :प्राजक्ता खांडेकर,संगीत: जब्बार धंनजय, गीतकार :प्राजक्ता खांडेकर,गायक :सुप्रिया सरोदे, विनायक बोकेफोडे, मेघाम्बरी छायाचित्रण :धनराज वाघ,ड्रोन ऑपरेटर :अक्षय गोडीवाले, संकलक :अनिल वाघमारे,कला दिग्दर्शक :सोमनाथ लोहार,असोसिऐट दिग्दर्शक :हर्षद पठाडे ,ध्वनीमुद्रण : अनिल वाघमारे ,वेशभूषा :गौरी गावकर, नाखवा रंगभूषा :सागर जाधव,केशभूषा:राणी गजभिये ,नृत्य दिग्दर्शक :गणेश भालेराव ,असोसिएट कोरिओग्राफर:शंकर  चपकानडे, प्रोडक्शन मॅनेजर :तुकाराम शिंदेआहेत.

अशी माहिती कस्तुरी फिल्म एंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत प्रेम लागी जीवा या चित्रपटाच्या निर्मात्या प्राजक्ता खांडेकर यांनी दिली 

ब्युरो रिपोर्ट 

जनहित न्युज महाराष्ट्र

नागपूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य