गुरुनानक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज उल्हासनगर -४, येथे विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मार्गदर्शन

गुरुनानक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज उल्हासनगर -४, येथे विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मार्गदर्शन
दिनांक ०८ ऑक्टोबर २०२२
 गुरुनानक हायस्कूल जुनियर कॉलेज उल्हासनगर-४ येथील प्राध्यापक अविनाश सर व धीरज सर यांच्या सहकार्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उल्हासनगर या शाखांच्या  विद्यमाने ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? याविषयी श्री राजेंद्र कोळी, श्री बबन सोनवणे, श्री बबन नागले व श्री शाहीर स्वप्नील शिरसाठ यांनी मार्गदर्शन, चमत्कार सादरीकरण, प्रबोधनात्मक चळवळीची गाणे तसेच फटाके मुक्त दिवाळी विषयी असा सलग ३-३० तास कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सुमारे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी व शिक्षकवृंद यांनी प्रबोधनाचा लाभ घेतला
तसेच संविधानात सांगितलेली मूलभूत तत्वे आणि मानवता धर्म यांचे महत्त्व  समजावून सांगितले
बाबा, महाराज, मांत्रिक तांत्रिक मंडळी आपल्या अंगी दैवी शक्ती असे भासवून चमत्कार करतात आणि लोकांना फसवतात. लोकांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण करतात. हे स्पष्ट करून सांगताना प्रत्यक्ष चमत्कारांचे सादरीकरण करून त्यामागील हातचलाखी आणि विज्ञान समजावून सांगितले
तसेच शाळेतील शिक्षक  प्रा अविनाश गायकवाड सर,  प्रा. धीरज सर, प्रा. मनिषा मॅडम आणिप्रा. चैताली मॅडम व ईतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर
संपादक : हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार