भारतीय बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या विद्यमाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
भारतीय बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या विद्यमाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) भारतीय बौध्द महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सुभाष टेकडी उल्हासनगर - ४ . येथे डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय बौध्द महासभेच्या समता सैनिकांच्यावतीने मानवंदना आणि ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सकाळी १० वा धम्म रॕलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करुन सकाळी ९ वा त्रिशरण पंचशील व बावीस प्रतिज्ञा आदी विविध कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारतीय बौध्द महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म रॕलीची सुरुवात डाॕ बाबासाहेब आंबेडकर चौक , सुभाष टेकडी , कानसाई रोड, कुर्लाकॕम्प चौक , कालीमाता मंदिर रोड , वंचित चे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालय , भाटिया चौक, सभाजी चौक लालचक्की ,सार्वजनिक हाॕल ते सुभाष टेकडी येथे धम्म रॕलीचा सांगता करण्यात आला तसेच या धम्म रॕली मध्ये घोषणा देण्यात आल्या की डाॕ बाबासाहेब आंबेडकर करे पुकार बौध्द धम्म का करो स्वीकार , जग मे बुध्द का नाम है यही भारत की शान है जय जय जय भिम आणि बुध्दंसरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामिचा आवाज सकाळी या धम्म रॕली मधून सुभाष टेकडी या परिसरात दुम दुमला आवाज तसेच या रॕली प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे ठाणे जिल्हा नेते सारंग जी थोरात, संघटक वनदेव पळसपगारे, उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई उबाळे, ज्येष्ठ नेते नानासाहेब चव्हाण , दिवाकर खळे, प्रशांत सोनवणे, प्रा. सुरेश सोनवणे, उपाध्यक्ष प्रकाश इंगळे, संघटक प्रकाश शिरसाट , वार्ड अध्यक्ष दिपक आढाव, विभाग प्रमुख महेंद्र आहिरे, सुनिल इंगळे, भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका अध्यक्ष अशोक व्हि जाधव , सरचिटणीस रोशन पगारे, कोषाध्यक्ष जीवन मोरे, उपाध्यक्ष प्रल्हाद पंडित , अशोक एफ शिरसाट , छगन सुरवाडे, सोमाजी खैरनार, दिलीप शिंदे , अरुण शिरसाट , संदीप उबाळे, ईश्वर सोनवणे, अनिल साहारे, बाबुराव साळवे, सुशिलाताई सोनवणे, रतनाताई कांबळे , कुसूमताई पंडित , देवीदास कांबळे , इंजिनियर गौतम बस्ते सर, सामाजिक कार्यकर्ते नवीन गायकवाड , यांच्यासह आदी समता सैनिक दल यावेळी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद