वंचित बहुजन आघाडी तर्फे सुभाष टेकडीतील तरुण मुलांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

वंचित बहुजन आघाडी तर्फे सुभाष टेकडीतील तरुण मुलांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
सिद्धार्थ स्नेह मंडळ मैदान सुभाष टेकडी उल्हासनगर 4 येथे दिनांक 25 व  26 जुन 2022 रोजी. वंचित बहुजन आघाडी तर्फे सुभाष टेकडीतील तरुण मुलांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
यामध्ये शनिवार रोजी लहान मुलांचे सामने खेळवण्यात आले.तसेच रविवारी खुल्या गटाचे सामने झाले.यांमध्ये एकूण 18 संघ सहभागी झाले.अंतिम सामना विजेते लहान मुलांचा गट वेनम संघ अंबरनाथ तर खुल्या गटात गोल्डन सॉकर संघाने बाजी मारली.अगदी अल्प वेळात व्यवस्थापन समिती विराग बोरकर व टीम ने खुप छान नियोजन केले.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य  जेष्ठ नेते सारंग थोरात यांनी दिले.या सामन्याचे पारितोषिक वितरणासाठी 
अध्यक्ष शेषराव वाघमारे.महिला अध्यक्ष रेखाताई उबाळे,प्रवक्ता प्रा.सुरेश सोनवणे,उपाध्यक्ष अभिजीत चंदनशिव,वॉर्ड अध्यक्ष अक्षय सोनवणे,आय.टी. सेल प्रमुख योगेश केदारे,वॉर्ड अध्यक्ष दिपक आढाव तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते 

अशी माहिती 
वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर 4 चे विभाग प्रमुख महेंद्र अहिरे यांनी दिली 
             ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
         संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप