उल्हासनगर शहरातील पॅनल क्र-१३ मध्ये लालचक्की चौक या ठिकाणी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

ॲड,प्रदिप गोडसे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्र -१३ मध्ये वट पूजन मोठ्या उत्साहात साजरी
शनिवार दि.०३.०६.२०२३ 
उल्हासनगर शहरातील पॅनल क्र-१३ मध्ये लालचक्की चौक या ठिकाणी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात वडाच्या झाडाचे प्रमाण घटले आहे आणि त्यात महिलांना वट पूजनासाठी त्यांच्या जवळपास कुठेच वडाचे झाड राहिले नाही. सुहासिनी महिला वडाच्या झाडाचे पूजन करून सदर झाडाभोवती दोरा बांधत आपल्याला सातजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. परंतु शहराल भागात वडाच्या झाडाचे प्रमाण घटत चाल्याने मनसेचे अँड. प्रदिप गोडसे, मनीषा गोडसे व वैभव कुलकर्णी यांनी मिळून महिलांना सोयीस्कर व्हावे म्हणून लालचक्की चौक, उल्हासनगर -४ या ठिकाणी मूळ वडाचे झाड लावून त्याठिकाणी सावलीसाठी मोठा मंडप उभारून सुहासिनींसाठी वट - पूजनाची सोय करण्यात आली होती. सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व पूजा करीता भटजीची सोय करण्यात आली होती.
  सदर वटपौर्णिमेला महिलांनी खूप चांगला प्रतिसाद देत अनेक महिलांनी याचा लाभ घेत आयोजकांचे आभार व्यक्त करत कौतुकही केले. सदर कार्यक्रम दर वर्षी आम्ही करत आहोत व यापुढे देखील करत राहणार असे अँड. प्रदिप गोडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. अँड. प्रदिप गोडसे हे सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात ज्याचे सर्व स्तरून कौतुक होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप