श्री साईधाम मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
उल्हासनगर (अशोक शिरसाट )
उल्हासनगर - ४ मध्ये. ल.की.आशान मार्ग गोप रुपचंदानी चौक.ओ.टी.सेक्शन येथे शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी श्री साईधाम मंदिराचा १२ वा वर्धापन दिनाचे आयोजन माजी महापौर लिलाबाई आशान, माजी नगर सेवक व उपशहर संघटक अरुणभाऊ आशान,पोलिस अशोक अशान यांनी केले होते
तसेच प्रथम या कार्याक्रमाची सुरुवात सकाळी - ५ वा - काकड आरती,करण्यात आली होती तसेच सकाळी वा - श्री गणपती आरती व पुजन पुण्याहवाचन दुपारी १२ वा,होम हवन श्री साई बाबा अभिषेक बलिदान पुर्णाहुती आणि दुपारी १२-३० ते ३ वाजेपर्यंत या महाप्रसाद भंडाराचा लाभ हजारो साई भविक भक्तानी आणि नागरिकांनी घेतला श्री साईधाम मंदिराचा १२ वा वर्धापन दिनाचा सोहळा प्रसंगी माजी नगरसेवक विजय पाटील,रमेश चव्हाण,प्रमोद टाले,प्रधान पाटील,अकुश म्हस्के,सुरेश केणी, राहुल इंगळे, महिला आघाडी व उद्योगपती जेठानंद,आर पी आयचे प्रकाश भंडारी,यांच्यासह पोलिस कर्मचारी,शिक्षक,पत्रकार,समाज सेवक,साई प्रेमी यांनी श्री साईधाम मंदिराचा १२ वा वर्धापन दिना निमित्त भेटी दिल्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद