सेंचुरी रेयॉन कामगार कल्याण केंद्र यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न ,

सेंचुरी रेयॉन कामगार कल्याण केंद्र यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न , 
२०० हून अधिक खेळाडूंच्या सहभाग , 

कल्याण:( मितेश जैन )
सेंचुरी रेयॉन कामगार कल्याण केंद्र यांचे वार्षिक क्रीडा स्पर्धा ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान उल्हासनगर येथील रामलीला मैदानात संपन्न झालाया स्पर्धेमध्ये २०० हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता.  या स्पर्धेमध्ये १६ वर्षा खालील मुले - मुली , १६ वर्षावरील मुलं-मुली,  पुरुष व महिला असे गट करण्यात आले होते. पुरुष गटासाठी १०० मीटर धावणे , २०० मीटर धावणे  , ४०० मीटर धावणे ,  ८०० मीटर धावणे ,  गोळा फेक ,  थाळीफेक ,  लांब उडी ,  तिहेरी उडी ,  रिले रन ,  तर महिला गटासाठी मार्बल अँड स्पून ,  फुटबॉल पासिंग , बुक बॅलेंसिंग , स्किपिंग  रेस ,  जलेबी रेस , केचिंग द बस या खेळांचे आयोजन करण्यात आले होतेबक्षीस वितरण समारंभासाठी सेंचुरी रेयॉनचे प्लांट एक्झिलरी मॅनेजर श्री राजाराम राव सर तसेच सेंचुरी रेयॉन कामगार कल्याण केंद्रचे सेक्रेटरी आर. बी.  सिंग सर यांच्या हस्ते विजेता खेळाडूंना पुरस्कार वितरण करण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनासाठी सॅमसंन सर व सदाशिव नाईक सर यांची महत्त्वाची भूमिका होती तर पंच म्हणून नितीन पाटोळे ,  सतीश रावत  , इंद्रपाल गोठारिया ,  स्वप्नील पष्टे , अल्लाउद्दीन शेख यांनी स्पर्धा पार पाडले. अशी माहिती बातमीदार मितेश जैन यांनी दिली 
 
   अशी माहिती बातमीदार मितेश जैन यांनी दिली    
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा   


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार