उल्हासनगर मध्ये दिव्यांग आधार सेवा संस्था या ठिकाणी जागतिक दिव्यांग दिन साजरा
दिनांक ०३/१२/२०२२ रोजी उल्हासनगर मध्ये दिव्यांग आधार सेवा संस्था,जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शेकडो दिव्यांग बांधव आणि शाळकरी विध्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजेने आणि राष्ट्रगीताने करण्यात आली त्या नंतर संस्थेने आखणी केल्या प्रमाणे दिव्यांग मतदार नोंदणी आणि दुरुस्ती उपक्रम राबविण्यात आला यामध्ये जवळपास 50 ते 60 नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्ती साठी अर्ज घेण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचे मौलिक मार्गदर्शन आणि अल्पोपहार वाटप करून, दिव्यांग एकता रॅलीकाढण्यात आली संस्था कार्यालय ते आंबेडकर चौक या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही रॅली पुढे डॉ.बाबसाहेब आंबेडकर वाचनालय पर्यंत काढण्यात आली होतीमहानगरपालिकेने निमंत्रित केल्याप्रमाणे येथील कार्यक्रमात संस्थेने मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. या नंतर पुढील स्थळी अंध हितकरणी संस्था, उल्हासनगर 4 यांनी या रॅली साठी भोजन आणि साहित्य वाटपाचे नियोजन केले होते. त्या ठिकाणी कार्यक्रम पार पडल्यानंतर रॅली ची सांगता दिव्यांग आधार सेवा संस्था या ठिकाणी करण्यात आलीया वेळी. संस्थेचे अध्यक्ष - सचिन सावंत, सौ. छाया सावंत, प्रवक्ते - बी. आर. पाटील, जनसंपर्क/प्रसारक - जितेंद्र गायकवाड, सुधीर प्रधान, परमेश्वर बोखारे, चंद्रभान बागुल, अर्चना चव्हाण ,यांनी कार्यक्रमाची सर्व सूत्रे व्यवस्थितपणे पार पडली या पूर्ण कार्यक्रमात डेकोरेटर कैलाश करंबळे यांनी खूप मोठे सहयोग केले,
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
संपादक हरी आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद