लोककला जपणाऱ्या सर्वांच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष द्यावे

*हा लेख प्रसिध्दी मिळावी म्हणून केला नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करत आहे.*
*लुप्त होत चाललेल्या  लोककला जपणाऱ्या सर्वांच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष द्यावे हाच त्यामागचा हेतू आहे..*
-------------------------------------------

*आज मला एक अंदाजे 12 वर्षांचा असलेला वासुदेव भेटला...*

*मी माझ्या बाईक मधे हवा भरण्यासाठी अंबरनाथ येथील फोरेस्ट नाका येथे उभा असताना ओमकार नावाचा अंदाजे  12 वर्षाचं पोर वासुदेव म्हणून दिसला.*

*मी कुतूहलाने त्याला जवळ बोलावून सहज त्याला विचारले कुठे चालला आहेस. बहुतेक तो एखाद्या बाईक वाला त्याला लिफ्ट देईल या आशेने केविलवाणा चेहरा करून येणाऱ्या जाणाऱ्या टु व्हिलर असणाऱ्या लोकांना पाहत होता.*

*मलाही ते जाणवत होते. अनवाणी पायाने उभा असल्याने त्याचे पाय भाजत होते. तो जवळ येत स्वतःच म्हणाला दादा मला पुढे सुदामा हॉटेल पर्यंत सोडता का. मी लगेचच त्याला गाडीवर बस म्हणालो आणि हे ऐकून त्याचा चेहरा खुलला.*

*त्या 5 मिनिटांच्या प्रवासात त्याच्या कडून त्याच्या विषयी आणि त्याच्या घराच्या विषयी थोडी माहिती घ्यावी म्हणून त्याला काही प्रश्न केले.*

*तु शाळा शिकतो का ? घरी कोण कोण असते ? आई काय करते ? वडिल काय करतात ? तु काही खाल्लं की नाहीस ? असे अनेक प्रश्न विचारले तेव्हा तो जे सांगत होता ते ऐकूण मनात अनेक  विचार येवू लागले ?*

*ओमकार सांगू लागला दादा मी सकाळ पासून काही खाल्लं नाही* 

*जोपर्यंत मी रेशन साठी आज दिवसभरात  पैसे जमा होत नाही तोपर्यंत काही खाणार नाही असा स्वामींना नवस केला आहे कारण माझ्या घरातील सर्व  उपाशी आहेत़.*

*घरी दोन बहिणी आहेत़. आई आहे. वडिल सुद्धा वासुदेव चे काम करतात परंतु त्यांची तब्बेत खराब असल्याने त्यांना जास्त काम होत नाही.* 

*आईच्या पायात रॉड टाकला आहे त्यामुळं आईला काही काम होत नाही. त्याच्या पेक्षा मोठी बहीण आईला घर कामात मदत करते आणि एक बहीण त्याच्या पेक्षा लहान आहे त्यामुळे घरात कमावते दुसरे कोणीच नाही म्हणून घराची संपूर्ण जबाबदारी ह्या कमी वयात ह्याच्यावर येवून पडली. त्यामुळे त्याने 7 वी तून शाळा सोडली आणि त्यांचा परंपरागत असणारा वासुदेवाचा लोककलेचा व्यावसाय करने त्याला भाग पडले.*

*ओमकारचा  सुध्दा वॉल खराब असल्याने बायपास चे ऑपरेशन झाले आहे हे ऐकून खुपच वाईट वाटले. ज्याच्या जिवावर घराचं भविष्य आणि जबाबदारी आहे तो सुध्दा शरीराने अधू आहे. त्याल ओझं उचलत नाही...*

*ओमकारला मी अनेक वेळा काही खावून घे म्हणून आग्रह केला परंतु त्याने नकार दिला. तो म्हणाला दादा मला जाणार नाही कारण मी काही खाताना घरच्यांची आठवण येते कारण घरी रेशन नसल्याने ते सर्व उपाशी आहेत़ आणि मी कसा खाऊ. रेशन घरी घेवून गेल्यावर सर्वासोबतच मी खातो.*

*त्याच्या बोलण्यातून घरच्या लोकांच्या प्रती असणाऱ्या  जबाबदारीची जाणीव होत होत.* 

*ह्या वयात इतका समजदारपणा त्याला आला होता हे खरोखरच विशेष म्हणावे लागेल.*

*लोककला जपत आहे म्हणून सुरुवातीला वाटले की ह्याला कुठे तरी नाश्ता चारुन त्याच्या हातात 10 रुपये ठेवावे परंतु त्याची सर्व हकीकत ऐकल्यावर मन राहवले नाही. मनात विचार आला की हा एव्हडासा मुलगा पुर्ण दिवसभर  अनवाणी पायाने काही न खाता पिता इकडे तिकडे फिरून अभंग आणि गाणी म्हणून घरी केव्हा जाणार आणि तोपर्यंत घरचे आणि तो उपाशी राहणार हे मनाला काही पटत नव्हते.*

*मी माझ्या एक दोन मित्रांना फोन केला नावे मुद्दाम लिहीत नाही कारण त्यांना ते आवडत नाही.*

*त्याला 20 दिवस पुरेल इतके गरजेचे रेशन भरून दिले आणि हातात 500 रुपये ठेवले.*

 *मला माहीत आहे ही मदत अगदी तुटपुंजी आहे परंतु काही दिवस का होईना ओमकार थोडं टेंशन फ्री होईल हा त्यामागचा हेतू होता.* 

*आता  किमान त्याला काही दिवस तरी स्वामींना नवस करून उपाशी रहावे लागणार नाही असे मनोमन विचार आले.*

*त्याला गाडीवर बसवून सर्व साहित्य घेवून त्याला सोडायला त्याच्या घरी गेलो होतो*.

*घर म्हणजे काय ओ चारी बाजूने बांबू ठोकून प्लास्टिक टाकले होते.*

*घरी गेलो तर ओमकारचा प्रत्येक शब्द खरा निघाला. त्याच्या आईला भेटलो बहिणीला भेटलो.*
*पायात रॉड असल्याने त्याची आई एकाच जागी बसून होती.* 

*ओमकारच्याच जिवावर घर चालते असे ती माऊली सांगू लागली. एखाद्या दिवशी उपाशी राहून किंवा जे असेल ते खाऊन दिवस काढतो असे बोलली हे ऐकून मन हेलावून गेले.*

*मित्रांनो सांगायचे तात्पर्य एव्हडेच आहे की आपली लोककला दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. ती जपण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत़. त्यांना मदतीची गरज आहे* 

*असे अनेक ओमकार आपल्या आवतिभवती तुम्हाला दिसतील त्यांना आवर्जून जवळ बोलवा त्यांची विचारपूस करा. काही मदत करता आली तर करा किंवा इतर कोणाकडून काही मदत देता आली तर प्रयत्न करा.* 

*शासनाने ह्यांचासाठी जी काही उपाययोजना केली असेल ती योग्य पध्दतीने त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी हिच अपेक्षा आहे...*

*धन्यवाद* 
*विनायक गेजगे* 
*अंबरनाथ*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार