अनोखा नाट्यानुभव : जन्मवारी

अनोखा नाट्यानुभव : जन्मवारी


दोन वेगवेगळ्या काळातील दोन स्त्रियांचा अनोखा प्रवास उलगडणारे 'जन्मवारी' हे नाटक आता रंगभूमीवर येत आहे
 हर्षदा संजय बोरकर यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी आणि त्यांची कन्या शर्वरी कुळकर्णी-बोरकर यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत. त्यांच्यासह शुभांगी भुजबळ, अमृता मोडक व कविता जोशी यांच्याही भूमिका नाटकात आहेत. 
'स्वेवन स्टुडिओज'ची निर्माती शांभवी बोरकर आणि सतीश आगाशे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. मंदार देशपांडे यांनी या नाटकाचे संगीत केले आहे. सचिन गावकर यांनी या नाटकाचे नेपथ्य केले असून, अमोघ फडके यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. नाटकाचे सूत्रधार सुरेश भोसले आहेत. संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा यांच्या अभंगरचना; हर्षदा संजय बोरकर यांची गीतरचना; कविता जोशी, मंदार देशपांडे, शर्वरी कुळकर्णी-बोरकर यांचे पार्श्वगायन या नाटकाला लाभले आहे. 
या नाटकाचा मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात होणार आहे. या प्रयोगानंतर १० फेब्रुवारीला आचार्य अत्रे रंगमंदिर (कल्याण), ११ फेब्रुवारीला बालगंधर्व नाट्यगृह (पुणे), २५ फेब्रुवारीला कालिदास नाट्यगृह (नाशिक) व २६ फेब्रुवारी रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह (ठाणे) येथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. 
प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार