सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प नंबर ४ मधील व्हिनस सिनेमा चौक जवळ असलेल्या शंकर उर्फ शेरी लुंड यांच्या एस व्ही एस पंचायत हाल या ठिकाणी सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ आणि दादा गोविंदराम फाउंडेशन यांच्या कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 28 जानेवारी रोजी संपन्न झालेनवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ३० गरजवंत महिलाना राशन की वाटप करण्यात आल्या तसेच शेकडो लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले,. यावेळी वीस रुपयांमध्ये कोणताही कपडा खरेदी करण्याची संधी महिलांना दिली या संधीचा लाभ शेकडो महिलांनी लाभ घेतला व महिलांनी वीस रुपयात कपडे खरेदी केले
तसेच चाळीस रुपयांमध्ये चाळीस आजारांचे तपास करण्याकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी गरजवंत महिला व बालकांसाठी एकूण १७ नवीन योजना ची माहिती राजकुमार शर्मा यांनी दिली
उद्घाटन प्रसंगी बोलताना महिलांना ABHA कार्डच्या योजना कशाप्रकारे मिळतात याची माहिती शंकर उर्फ शेरी लुंड यांनी आलेल्या उपस्थित महिलांना सांगितली,. या उद्घाटन सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित देविदास भारवाणी, किशोर वनवारी, शांतीदूत रमेश आहुजा, अमर लुंड, वीरदास लुला, लतीस चावला, भारत भटीजा, जितू खन्ना, स्नेहा चुग, रवीना कोकल, मुस्कान ममतानी, रेखा थदानी,तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट, समेत अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे शंकर उर्फ शेरी लुंड व राजकुमार शर्मा यांनी स्वागत व आभार व्यक्त केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद