भटक्या विमुक्तांचे राज्यस्तरीय अधिवेशन
भटक्या विमुक्तांचे राज्यस्तरीय अधिवेशन भटक्या विमुक्तांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच पांडुरंग शेलार यांचे अध्यक्षतेखाली महात्मा फुले संस्कृती भवन हडपसर येथे पार पडलेअधिवेशनासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून सुमारे १५०० जणांनी उपस्थिती दाखवली अधिवेशनात खालील मागण्या पांडुरंग शेलार व अध्यक्ष हरी सावंत यांनी मांडल्या जातीच्या दाखल्यासाठीची 1961 पूर्वीचे पुरावे मागणारी अट शासनाने शिथिल करावी( समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना श्रीमती मनिषाताई रावळ )
शासकीय जागेवरील तसेच गायरान जमिनी वरील अतिक्रमणे नियमित करावीतशासकीय योजनेतून भटक्या विमुक्तांसाठी किमान 400 ते 500 स्क्वेअर फुटांची घरे बांधून मिळावितबेरोजगार युवकांना व महिलांना लघु उद्योगासाठी बिनव्याजी पाच ते दहा लाख रुपये अनुदान मिळावेत्याकरिता वसंतराव नाईक महामंडळाला येत्या अर्थसंकल्पात किमान शंभर कोटी रुपये तरतूद करावी जेणेकरून भटके विमुकतांची बेरोजगारी मुक्त होईल व महिलां स्वतःच्या पायावर उभे राहतील व त्यांचे जगणे सुखरूप होईलअशा प्रकारे अनेक प्रश्नांवर उपस्थित मान्यवरांनी व्यथा मांडल्या अनेक जिल्ह्यातून आलेल्या भटक्या विमुक्तांच्या पदाधिकारी यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तिर्व आंदोलन करण्याचा इशारा दिला या कार्यक्रमाला यशस्वी करण्या करिता अनेक जिल्ह्यातील भटके समाजातील पदाधिकारी यांनी मेहनत घेतलीया वेळी हरी सावंत,राकेश भोसले, सुमनताई गायकवाड, सुवर्णा शिंदे,कल्पनाताई पांडे, मनीषा ताई रावळ, सुंदर डांगे, शंकर आडे,कामाक्षीताई सोने,गोरख पाटसकर लीलावती हिंगमिरे, संजय बामणे, केतन पवार, गणपत जाधव, राजेंद्र देवगन, पुष्पाताई जाधव, समेत अनेक मान्यवर उपस्थित होतेप्रतिनिधी सुनील वाल्हेकर जनहित न्युज महाराष्ट्र हडपसर पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद